मोठी बातमी : इंडिया आघाडीच्या खासदारांचे 'क्रॉस व्होटिंग'; बी. सुदर्शन रेड्डींच्या कोट्यातील मते फुटली

Vice President Election : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीए उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 152 मतांनी जिंकली. इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत भाजपप्रणित आघाडीस दणदणीत विजय मिळाला.
CP Radhakrishnan, NDA candidate and Maharashtra Governor, celebrates victory in Vice President election after defeating INDIA bloc’s B. Sudarshan Reddy by 152 votes.
CP Radhakrishnan, NDA candidate and Maharashtra Governor, celebrates victory in Vice President election after defeating INDIA bloc’s B. Sudarshan Reddy by 152 votes.Sarkarnama
Published on
Updated on

Vice President Election of India : भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजपप्रणित एनडीए आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा तब्बल 152 मतांनी पराभव केला. राज्यसभेचे सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी सी.पी.मोदी यांनी हा निकाल जाहीर केला.

लोकसभा व राज्यसभेतील एकूण 781 खासदार मतदार आहेत. त्यापैकी बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती आणि शिरोमणी अकाली दलाने उपराष्ट्रपतीपदाच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे प्रत्यक्ष 767 खासदारांनी मतदान केले. त्यातील 752 मते पात्र तर 15 मते अपात्र ठरली. त्यानंतर विजयासाठी 377 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मतमोजणीमध्ये सी.पी. राधाकृष्णन यांना पहिल्या क्रमांकाची 452 मते मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.

विरोधकांची 15 मते फुटली :

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून 315 खासदारांचे संख्याबळ होते. या 100 टक्के खासदारांनी मतदान केले होते. विरोधकांनी शंभर टक्के मतदान केल्याने हा एकप्रकारे विक्रम असल्याची चर्चा होती. पण या विक्रमाचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्या विजयासाठी फायदा होऊ शकला नाही. त्यातही 315 पैकी रेड्डी यांना 300 मते मिळाली. त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीची 15 मते फुटल्याचे समोर आले आहे.

CP Radhakrishnan, NDA candidate and Maharashtra Governor, celebrates victory in Vice President election after defeating INDIA bloc’s B. Sudarshan Reddy by 152 votes.
Vice President Election: NDA ची बाजी, सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली होती. त्यातच भाजपने रणनीतीत बदल करत 08 आणि 09 सप्टेंबरला 19 संसदीय समितीच्या बैठका बोलावून विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीवर कुरघोडी केली होती. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला होता. अखेरीस 152 मतांच्या फरकानं इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com