
New Delhi News : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतिपदासाठी मंगळवारी (ता.09) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आता एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी अखेर बाजी मारली आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन (CP radhakrishnan) व इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवले होते. या दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
उपराष्ट्रपती पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. निवडणूक अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या मतमोजणीनुसार, सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना एकूण 300 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 768 खासदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली असतानाच भाजपने रणनीतीत बदल करत 08 आणि 09 सप्टेंबरला 19 संसदीय समितीच्या बैठका बोलावून विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीवर कुरघोडी केली होती. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण 152 मतांच्या फरकानं इंडिया आघाडीच्या रेड्डी यांचा पराभव केला.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सहसा बिनविरोध होते किंवा कमी चर्चेत असते. मात्र, एनडीएच्या या खेळीमुळे, ही निवडणूक आता अधिक चुरशीची झाली आहे. एनडीएच्या या 'मास्टरस्ट्रोक'मुळे विरोधी पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.