

Rakesh Kishor beaten by chappal : माजी सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर भर कोर्टात सुनावणी सुरु असताना बूट फेकणाऱ्या वकिलावरच आता चप्पल खाण्याची वेळ आली. दिल्लीतीलच एका कोर्टात या वकिलाला चप्पलनं मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोणी केला मात्र कळू शकलेलं नाही.
व्हायरल व्हिडिओनुसार, माजी CJI भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा वकील राकेश किशोर हे ९ डिसेंबर रोजी दिल्लीच्या कडकड्डूमा कोर्टात काही कामानिमित्त आले होते. यावेळी काही लोकांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. चप्पलनं त्यांना मारहाण करण्यात आली. चप्पलनं मारहाण होत असताना राकेश किशोर हे हातानं ते अडवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत दिसत आहेत. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला राकेश किशोर हे विचारत आहेत की, तू कोण आहेस? मला का मारतो आहेस? यानंतर किशोर यांनी 'सनातन धर्म की जय हो' अशी नारेबाजीही केली.
राकेश किशोर यांना चप्पलनं मारहाण प्रकरणी पोलिसांत कुठलीही तक्रार दाखल झालेली आहे. तर दुसरीकडं हा हल्ला नेमका कोणी केला हे देखील अद्याप समोर आलेलं नाही. व्हिडिओमध्ये देखील मारहाण करणाऱ्याचा चेहरा देखील दिसत नाही.
माजी सरन्यायाधिशांवर बूट फेकल्यानंतर राकेश किशोर यांच्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुरु झाली होती. तसंच त्यांच्या या कृत्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं देखील झाली होती. यानंतर किशोर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. पण असं असलं तरी ईश्वर आपल्यासोबत आहे, त्यामुळं मला काहीही होणार नाही. माझ्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या लोकांना पोलिसांनी हटवलं होतं, माझ्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात होते. पण आजूनही माझ्या जीवाला धोका आहेच, मी सुरक्षेबाबत जास्त बोलू शकत नाही, असंही यावेळी राकेश किशोर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बूट फेकल्याच्या घटनेनंतर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकील राकेश किशोर यांच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती उलट त्यांना माफ केलं होतं. या वकिलावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करण्यास त्यांनी नकार दिला होता. पण बार काऊन्सिल ऑफ इंडियानं मात्र किशोर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.