नवी दिल्ली : ‘द केरला स्टोरी’ला स्टोरीला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी डेमोक्रॅटीक पक्षाच्या सरकारने ‘द रिअल केरला स्टोरी’ आणली आहे. यातून राज्य सामजिक समरसता आणि पुरोगामी मूल्यांवर भर देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा फोटोही त्या जाहिरातीच्या पोस्टर्सवर आहे. त्यामुळे आगामी काळात ‘द केरला स्टोरी’ विरुद्ध ‘द रिअल केरला स्टोरी’ असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. (Vijayan Govt brings 'The Real Kerala Story' to answer 'Kerala Story')
द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत चर्चेत आहे. सध्या या चित्रपटासंदर्भातील चर्चा थंडावली असतानाच केरळ (Kerala) सरकारने उत्तरादाखल तयार केलेल्या द रिअल केरला स्टोरीमुळे हा चित्रपट (Cinema) पुन्हा चर्चेत आला आहे.
द रिअल केरला स्टोरी ही जाहिरात प्रसिद्ध करताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, आमचे सरकार सामाजिक न्यायाचा अवलंब करून सर्वसमावेशक विकासाला चालना देते, जे सर्वांना सक्षम बनविते. (Kerala Story)
दरम्यान त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, डेमोक्रॅटीक पक्षाच्या सरकारच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही ‘द रिअल केरला स्टोरी’ साजरी करत आहोत. जिथे स्वप्ने पाहिली जातात आणि ती पूर्णही होतात. त्याचबरोबर माणसांमध्ये माणुसकीही दिसते. मात्र, नुकताच देशभरात प्रदर्शित झालेल्या ’द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटामध्ये केरळला चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे, असा आरोपही मुख्यमंत्री विजयन यांनी केला आहे.
या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री विजयन यांच्यासोबत शेतकरी, आरोग्य कर्मचारी, ट्रान्सजेंडर आदींसह समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचे चित्र आहे. त्याच वेळी जाहिरातीत असा दावाही करण्यात आला आहे की, करुणा आणि सामाजिक न्याय डाव्या सरकारच्या धोरणांना चालना देतात, जे उपेक्षित समुदायांना सशक्त करतात आणि सर्वांना समान संधी देतात.
दरम्यान, विजयन सरकारच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, डाव्या सरकारच्या कथित कुशासन आणि भ्रष्टाचाराविरोधात विरोधकांनी निदर्शने सुरू केली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.