CM N Biren Singh : मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार, आता थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरच दहशतवाद्यांचा हल्ला

Manipur CM Biren Singh's Convoy Attacked : मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या अतिरिक्त सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात काही सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.
CM N Biren Singh
CM N Biren SinghSarkarnama

Manipur Violence : मागील अनेक दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमुळे चर्चेत असणाऱ्या मणिपूरमधून (Manipur) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या अतिरिक्त सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात काही सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.

मणिपूरचे (Manipur) मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह (CM N Biren Singh) हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिरीबामचा दौरा करणार होते. या दौऱ्याआधी जिरीबाम येथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघालेल्या अतिरिक्त सुरक्षा पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआयडी राज्य पोलिस, सीआयएसएफ जवान आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी जवानांना इंफाळला नेण्यात आलं आहे.

जिरीबाममध्ये मागील 2 दिवसांपासून हिंसाचाराच्या बातम्या येत असून येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री बिरेन सिंह मंगळवारी जिरीबामला भेट देणार होते.

याआधीच हा हल्ला झाला आहे. हा हल्ला राष्ट्रीय महामार्ग-37 वर कोटलेन गावाजवळ झाला. या ठिकणी अजूनही गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री आपला दौरा रद्द करणार की, ते जिरीबामला जाणार याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

CM N Biren Singh
Jayadatt Kshirsagar : लोकसभेच्या रणधुमाळीत जयदत्त क्षीरसागर 35 वर्षांत पहिल्यांदाच 'Wait & Watch'च्या भूमिकेत!

जिरीबाममध्ये का उफाळला हिंसाचार?

6 जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार उफाळला आहे. या घटनेमुळे सुमारे 70 घरे आणि काही सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली आहे. तर हिंसाचाराच्या भीतीने अनेक लोकांनी इथून पळ काढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com