
Repeating Events in 2025 : A Historical Echo : भारतासह जगभरात 2025 मध्ये अनेक दुर्दैवी घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, कुंभमेळ्यासह बेंगलुरूमध्ये झालेली चेंगराचेंगरी, अहमदाबाद विमान अपघात अशा घटनांनी भारताला मोठा हादरा बसला आहे. 2025 मध्ये घडलेल्या या घटनांमुळे आता 1941 या वर्षाची चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियात दोन्ही वर्षाचे कॅलेंडर व्हायरल होत आहे. 1941 या वर्षाप्रमाणे 2025 हेही वर्ष असल्याचा दावा अनेक नेटकऱ्यांकडून केला जात आहे. त्याला दुजोराही मिळत आहे. 1941 मध्ये जगात दुसऱ्या महायुध्दाचे पडसाद उमटत होते. जर्मनी, अमेरिका, रशिया, फ्रान्स, बिटन असे अनेक देश युध्दात उतरले होते.
27 मे 1941 रोजी ब्रिटनच्या नौदलाने फ्रान्सजवळ उत्तर अटलांटिकमध्ये जर्मनीची युध्दनौका बुडवली होती. या घटनेतील मृत सैनिकांचा आकडा तब्बल दोन हजारांहून अधिक असल्याचा सांगण्यात आला होता. या घटनेची तुलना अहमदाबाद विमान अपघाताशी केली जात आहे. 1941 मध्येच नाझी जर्मनीने सोव्हिएत संघावर आक्रमण केले होते.
त्याचप्रमाणे जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केल्याने अमेरिकाही युध्दात उतरला होता. यूरोप, आशिया आणि आफ्रिका खंडात युध्दाचा भडका उडाला होता. या युध्दामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटली गेली होती. वर्षअखेरपर्यंत संपूर्ण जगाला महायुध्दाचे चटके सोसावे लागत होते.
2025 मध्ये कारगील युध्दानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाचा मोठा संघर्ष झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकमधील नऊ दहशतवादी ठिकाणे उद्धस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पण भारताने पाकला सडेतोड उत्तर देत गुडघे टेकवायला भाग पाडला.
आठवडाभरापासून इराण आणि इस्त्राईलमध्ये युध्दाचा भडका उडाला आहे. त्यामध्ये अमेरिकाही उडी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. याचवर्षी इस्त्राईल आणि हमासमध्येही संघर्ष झाला होता. सातत्याने अशा घटना घडत असल्याने 2025 ची 1941 या वर्षाशी तुलना होत आहे. त्यामागे एवढेच कारण नाही, तर दोन्ही वर्षांतील कॅलेंडरही सारखेच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.