भाजपमध्ये नाराजीनाट्य; मुख्यमंत्रिपदाबाबत विचारताच राणे भडकले अन् दाखवलं नेतृत्वाकडं बोट

गोव्यात मुख्यमंत्रिपदावरून भाजपमधील नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे.
Vishwajit Rane and Pratapsingh Rane
Vishwajit Rane and Pratapsingh RaneSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले असले तरी मुख्यमंत्रिपदावरून नाराजीनाट्य समोर आले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांनाच पसंती दिली आहे. यावरून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले भाजप नेते विश्वजित राणे हे नाराज असल्याचे समोर येत आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांवरच राणे भडकल्याचे समोर आले आहे. राणेंनी थेट पक्ष नेतृत्वाकडे बोट दाखवल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या गळ्यात टाकली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे हे स्पर्धेत होते. सावंत यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर काही वेळातच राणे हे थेट राज्यपालांना जाऊन भेटले होते. ही भेट व्यक्तिगत स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या भेटीबद्दल भाजप नेत्यांना काहीही माहिती नव्हती. आता सावंतांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा करताच ते थेट पत्रकारांवरच भडकले.

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राणे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा केली. यावर राणेंचा पारा चढला. ते पत्रकारांवर भडकले. मला असले फालतू प्रश्न विचारू नका, असे त्यांनी सुनावले. मी माझ्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी आलो आहे. असे प्रश्न तुम्ही थेट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाच विचारा, असेही राणेंनी बजावले. यामुळे राणेंची नाराजी समोर आली आहे.

Vishwajit Rane and Pratapsingh Rane
निलेश राणेंचं नाव घेताच जयंत पाटील म्हणाले, अशांवर मी बोलत नाही!

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली आहे. विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे आरोग्यमंत्री होते. राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राणेंचे पिता माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे काँग्रेसमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील भाजप सरकारने प्रतापसिंह राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यानंतर प्रतापसिंह राणेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.

Vishwajit Rane and Pratapsingh Rane
विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात हक्कभंग अन् थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

राणे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदावर मानले जात आहेत. त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे गोव्यातील राजकारणात अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. यातच मुख्यमंत्रिपदासाठी डावलण्यात आल्याने राणे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पुढील निर्णयाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com