निलेश राणेंचं नाव घेताच जयंत पाटील म्हणाले, अशांवर मी बोलत नाही!

निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
Nilesh Rane and Jayant Patil
Nilesh Rane and Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही बहुमताने सत्तेत येऊ, असा असा दावा करीत आहेत. यावरून राजकीय शिमगा सुरू झाला आहे. भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोमणा मारला आहे.

भाजप नेत्यांच्या दाव्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टोला लगावला. आम्हाला 2024 पर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद, असे पाटील म्हणाले. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता जयंत पाटील म्हणाले की, असल्या वक्तव्यावर आणि अशा व्यक्तींच्यावर मी कधीही काही बोलत नाही. लोक समजून जातात कुणाची काय हे आहे ते.

Nilesh Rane and Jayant Patil
विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात हक्कभंग अन् थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा भाजपकडून केला जात आहे. याला शरद पवार यांनी उत्तर दिले होते. भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर निलेश राणेंनी ट्विट करीत याला उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, भाजपची सत्ता पवार साहेबांना कशी परवडेल, कारण त्यात दाऊदचा सहभाग नसेल. पवार साहेबांनी खरं जनमत घेतलं तर त्यांना कळेल त्यांच्या राजकारणाचा आता लोकांना कंटाळा आलाय. मोठी लॉटरी एकदाच लागते पवार साहेब नेहमी नाही.

Nilesh Rane and Jayant Patil
सरकारची मोठी घोषणा अन् त्यानंतर 24 तासांतच राणेंना आजीवन कॅबिनेटचा दर्जा बहाल

शरद पवारांच्या या उत्तरावर भाजपनेही खुले आव्हान दिले आहे. भाजपने म्हटले आहे की, शरद पवारांनी भाजपची काळजी करु नये, स्वत:च्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com