शहांनी शब्द पाळला! राणेंना नव्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं स्थान

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ प्रमोद सावंत यांनी घेतली असून, विश्विजत राणे हे सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Vishawjit Rane and Amit Shah
Vishawjit Rane and Amit Shah
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याचवेळी भाजप नेते विश्वजित राणे हे यांचे नव्या सरकारमध्ये स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राणे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंची समजूनत काढून त्यांचे स्थान महत्वाचे राहील, असा शब्द दिला होता. अखेर हा शब्द शहांनी पाळल्याचे आज दिसून आले.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या गळ्यात टाकली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे हे स्पर्धेत होते. सावंत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. त्याचदिवशी काही वेळातच राणे हे थेट राज्यपालांना जाऊन भेटले होते. ही भेट व्यक्तिगत स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या भेटीबद्दल भाजप नेत्यांना काहीही माहिती नव्हती.

मुख्यमंत्रिपदावरुन हा वाद समोर आल्यानंतर सावंत आणि राणेंना दिल्लीला पाचारण करण्यात आले होते. सावंत यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब केल्याचे सांगत राणेंची समजूत खुद्द पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काढली होती. नव्या सरकारमध्ये राणेंचे स्थान महत्वाचे असेल, असा शब्द त्यांना देण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनतर त्यांचे राणेंचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे असेल, असेही आश्वासन देण्यात आले होते. अखेर शहांनी त्यांची शब्द पाळला. मुख्यमंत्री सावंत यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लगेचच राणेंनी शपथ घेतली. यामुळे मुख्यमंत्रिपद सावंतांना मिळाले असले तरी महत्वाची खाती राणेंकडे येऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

Vishawjit Rane and Amit Shah
गोव्यात भाजपची कोंडी! काँग्रेसने शपथविधीच्या आधी टाकला डाव

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली होती. विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे आरोग्यमंत्री होते. राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राणेंचे पिता माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे काँग्रेसमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील भाजप सरकारने प्रतापसिंह राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यानंतर प्रतापसिंह राणेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com