Jammu-Kashmir Voting News : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 24 जागांसाठी बंपर मतदान!

Jammu-Kashmir Assembly Election First phase Voting : सर्वाधिक मतदान किश्तवाडामध्ये तर सर्वात कमी...; जाणून घ्या, एकूण किती टक्के झालं मतदान?
Jammu-Kashmir Voting
Jammu-Kashmir VotingSarkarnama
Published on
Updated on

Jammu-Kashmir Vidhan Sabha Election Update : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज(बुधवार) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला, परिणामी पहिल्या टप्प्यातील 24 जागांसाठी बंपर मतदान झाल्याचे दिसून आले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. पहिल्या टप्प्यातील 24 जागांमध्ये काश्मिरच्या 16 आणि जम्मूच्या 8 जागांचा समावेश आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 58.85 टक्के मतदान झाले.

कलम 370 हटवण्यात आल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत असल्याने, मतदानाच्या दिवशी सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवली गेली होती. निवडणूक आयोगाने विस्थापित काश्मिरी पंडितांसाठीही विशेष व्यवस्था केली होती. दिल्ली, जम्मू आणि उधमपूर येथे विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी विशेष मतदान केंद्र बनवले गेले होते. यामध्ये दिल्लीत चार, जम्मूमध्ये १९ आणि उधमपूरमध्ये एका विशेष मतदान केंद्राचा समावेश आहे.

Jammu-Kashmir Voting
PM Modi and Vidhan Sabha Election: मोठी बातमी! पुण्यातून पंतप्रधान मोदी फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग?

जम्मू-काश्मीरमध्ये(Jammu-Kashmir) एकूण तीन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आज(18सप्टेंबर) रोजी झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची तारीख 1 ऑक्टोबर आहे. तर या सर्व टप्प्यातील मतदानाचा निकाल एकाच दिवशी 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

एकूण 90 जागा असणार विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 13 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थानिक पक्ष म्हणून महबूबा मुफ्ती यांची पीडीपी आणि ओमर अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष प्रामुख्याने ही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. तर भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

Jammu-Kashmir Voting
Bawankule on MVA : 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकूण 18 मुख्यमंत्री फिरताय'; बावनकुळेंनी लगावला टोला!

मतदानाबाबत माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी पीके पोल यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये एकूण शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. अशी एकही घटना घडली नाही, जिथे आम्हाला पुन्हा मतदान प्रक्रिया घ्यावी लागली. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात किश्तवाडमध्ये सर्वात जास्त 77 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 46 टक्के मतदान झाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com