PM Modi and Vidhan Sabha Election: मोठी बातमी! पुण्यातून पंतप्रधान मोदी फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग?

Modi at Pune News : ...म्हणून याकडे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याच्या दृष्टीने पाहण्यात येत आहे आणि तशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते काही विकास कामांची उद्घाटनं करणार आहेत आणि काही कार्यक्रमांनाही उपस्थिती लावणार आहेत.

त्याचबरोबर काही गाठीभेटींचे देखील या दौऱ्यामध्ये नियोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याकडे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याच्या दृष्टीने पाहण्यात येत आहे आणि तशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या दौऱ्यामध्ये 26 सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर ते शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सहभागी होतील. त्यानंतर ते पुणे मुक्कामी राहणार आहेत. याबाबत चोख व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

PM Modi
Bawankule on MVA : 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे एकूण 18 मुख्यमंत्री फिरताय'; बावनकुळेंनी लगावला टोला!

दुसऱ्या दिवशी ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विकसित भारत या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. दुपारी बारा ते अडीच दरम्यानचा काळ हा आरक्षित ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करू शकतात असं देखील बोलले जात आहे. सध्या महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचं पाहायला मिळत नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या अंतर्गत तणाव पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महायुतीला एक संघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काही चर्चा होते का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

27 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी तुकाराम जगन्नाथ कॉलेज खडकी येथील विकसित भारतच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

PM Modi
Rajendra Yadravkar : राजेंद्र यड्रावकरांनी महायुतीला दिला आणखी एक धक्का; आता थेट..!

पुणे जिल्ह्यात दोन दिवस खासगी अवकाश उड्डाणांना मनाई -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ व २७ सप्टेंबर २०२४ रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ सप्टेंबर ते २७ सप्टेबर रोजी रात्रीपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com