Waqf Amendment Bill Update : वक्फ विधेयक पास होताच भाजपच्या मित्रपक्षाला धक्यावर धक्के! पाच जणांनी पक्ष सोडला अन्...

Waqf Amendment Bill Five Leaders Resign : जेडीयूची अल्पसंख्याक कक्षाची होणारी बैठक पक्षाकडून रद्द करण्यात आली आहे. जेडीयूमधील मुस्लिम नेते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती आहे.
Waqf Amendment Bill and modi
Waqf Amendment Bill and modisarkarnama
Published on
Updated on

JDU News : वक्फ सुधारण विधेयक संसदेच्या दोन सभागृहात बहुमताने मंजुर करण्यात आले आहे. भाजपकडे लोकसभेत बहुमत नव्हते मात्र, नितीश कुमारांच्या जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीने साथ दिल्याने लोकसभेत हे विधेयक भाजप आरामात मंजुर करू शकली. मात्र, हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

जेडीयूमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. नितीशकुमार यांच्यावर मुस्लिम नेते नाराज आहेत. जेडीयूमधील पाच मोठ्या नेत्यांनी आत्तापर्यंत राजीनामा दिला आहे. त्यामध्ये नदीम अख्तर, राजू नैयर, तबरेज सिद्दीकी अलीग, मोहम्मद शाहनवाज मलिक आणि मोहम्मद कासिम अंसारी यांचा समावेश होतो आहे. मात्र, या राजीनाम्यानंतर देखील नितीश कुमार यांच्यावरील संकटे थांबण्याचे नाव घेत नाहीत.

Waqf Amendment Bill and modi
Congress Politics : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचे नाशिकमध्ये 'जय श्री राम', रामनवमीच्या मुहूर्तावर जाणार काळाराम मंदिरात

जेडीयूमध्ये असलेले मुस्लिम नेते आपली रणनीती बनवण्यात व्यग्र आहे. या रणनितीतून नितीश कुमार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पक्षाची अल्पसंख्याक कक्षाची होणारी बैठक पक्षाकडून रद्द करण्यात आली आहे. जेडीयूमधील मुस्लिम नेते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीवर परिणाम

बिहार विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये 16 टक्के मुस्लिम मतदार आहेत. हे मतदार अनेक जागांचे भवितव्य ठरवतात. यातील मोठ्या गटाचा पाठींबा हा नितीश कुमारांना होता. मात्र, त्यांनी वक्फ विधेयकाला दिलेल्या पाठींबामुळे मुस्लिम मतदारांच्या नाराजीचा सामना विधानसभेत नितीश कुमार यांच्या पक्षाला करावा लागण्याची शक्यता आहे.

राजीनाम्याचे कारण सांगितले...

राजू नैयर यांनी जेडीयूचा राजीनामा देताना आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, 'वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर झाले आणि त्याला पाठिंबा दिला गेला, त्यामुळे मी जेडीयू मधून राजीनामा देत आहे. मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्या या काळ्या कायद्याच्या बाजूने जेडीयूने मतदान केल्याने मी खूप दुःखी आहे.'

Waqf Amendment Bill and modi
BJP Politics: सावकारी करणारा भाजप नेता म्हणतो, " सरकार उलथवण्यासाठीचे ते ६०० खोके माझ्याकडेच होते"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com