Waqf Bill update : वक्फ विधेयकावरून नितीश कुमारांच्या पक्षात फूट; विश्वासू नेत्याने दिला इशारा...

Bihar JDU controversy Waqf Bill political impact : लोकसभेदत दुपारी 12 वाजता वक्फ सुधारित विधेयक सादर होणार आहे. त्यावर चर्चेसाठी आठ तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे.
Waqf Bill, Nitish Kumar
Waqf Bill, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics : लोकसभेत वक्फ (संशोधन) विधेयक सादर होण्याआधीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलामध्ये खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे विधेयक सादर होत असल्याने आधीच नितीश कुमारांचे टेन्शन वाढलेले असताना आता पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. नितीश कुमार यांच्या विश्वासू आमदाराने विधेयक सादर होण्याआधीच त्याला विरोध केला आहे.

लोकसभेत दुपारी 12 वाजता वक्फ सुधारित विधेयक सादर होणार आहे. त्यावर चर्चेसाठी आठ तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. मोदी सरकारने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाने केलेल्या मागण्या मान्य करत आपली बाजू सेफ केली आहे. मात्र, त्यानंतरही संयुक्त जनता दलामध्ये बिलावरून असलेले मतभेद उघड झाले आहेत.

Waqf Bill, Nitish Kumar
Waqf Amendment Bill : 'वक्फ' विधेयकावर सरकारची अग्निपरीक्षा? भाजपकडे नाही बहुमत; काय आहे लोकभेतील 'नंबर गेम'?

जेडीयूचे आमदार गुलाम गौस यांनी वक्फ विधेयकाला उघडपणे विरोध केला आहे. विशेष म्हणजे ते दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांना भेटले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौस यांनी विधेयक लोकसभेत सादर झाल्यास संपूर्ण देशात मुस्लिम समाज आंदोलन करेल, असा इशाराच दिला आहे.

विधेयक सादर न करता केंद्रात परत घ्यावे. देशाला आंदोलनाच्या आगीत झोकू नका. ज्याप्रमाणे शेतकरी कायदे मागे घेतले, त्याप्रमाणे केंद्राने वक्फ विधेयक मागे घ्यावे, असे आवाहन गौस यांनी केले आहे. नितीश कुमार यांची संमती असती तर पक्षाने तीन सुचना पाठवल्या नसत्या, असे सांगत गौस यांनी एकप्रकारे नितीश कुमार अजूनही या विधेयकाबाबत संभ्रमात असल्याचे संकेत दिले आहेत.

Waqf Bill, Nitish Kumar
Waqf Bill Controversy : वक्फ विधेयकाबाबत मोठी अपडेट; चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यासमोर सरकार झुकले...

दरम्यान, जेडीयूने सर्व खासदारांना लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे लोकसभेत पाठिंबा दिला जात असताना राज्यातील मुस्लिम आमदारांमध्ये नाराजी असल्याचे आता उघड झाले आहे. बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत निवडणुका आहेत. मुस्लिम आमदार आणि मुस्लिम समाजाची नाराजी नितीश कुमार यांना परवडणारी नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाची द्विधा मनस्थिती झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com