BJP : स्थापना दिनानिमित्त भाजपचे 'स्पेशल सेलिब्रेशन', आठवडाभर जंगी कार्यक्रमांची रेलचेल

BJP Foundation Day : भाजपची स्थापना 6 एप्रिल रोजी झाली होती, त्यामुळे हा दिवस पक्षासाठी विशेष महत्त्वाचा आहे. यंदा भाजपचा 45 वा स्थापना दिवस असून तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
BJP Foundation Day
BJPSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भाजपची स्थापना 6 एप्रिल रोजी झाली होती, त्यामुळे हा दिवस पक्षासाठी विशेष महत्त्वाचा आहे. यंदा भाजपचा 45 वा स्थापना दिवस असून तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने 6 एप्रिलपासून पुढच्या आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून भाजपने भव्य स्वरुपात आंबेडकरी जयंती साजरी करण्याचे नियोजन केले आहे.

स्थापना दिनाच्या दिवशी 6 एप्रिलला भाजप पदाधिकाऱ्यांकडून कार्यालयांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. घरोघरी ध्वजारोहण देखील करण्यात येईल. ध्वजासोबत सेल्फी काढून #bjp4viksitBharat या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करणे बंधनकारक केलं आहे.

BJP Foundation Day
Nashik Kathe Galli Dargah : पंधरा दिवसांत अतिक्रमण काढावेच लागणार, दर्ग्याच्या विश्वस्तांकडे आता काहीच पर्याय नाही?

7 एप्रिलला प्रत्येक बूथवर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय आणि भारत माता यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. बूथ समिती सदस्य, समिती प्रमुख, प्राथमिक व सक्रिय सदस्य आणि वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहतील. वरिष्ठ कार्यकर्त्यांचे भाषण होईल. घरोघरी ध्वज फडकवून, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

8 ते 9 एप्रिल दरम्यान विधानसभा स्तरावर सक्रिय सदस्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात भाजपच्या निवडणूक आणि संघटनात्मक विस्तार, भारतीय राजकारणातील भाजपने घडवलेले बदल, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 11 वर्षांतील भारताचा विकास यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासोबतच 7 ते 12 एप्रिल दरम्यान ‘बूथ चलो अभियान’अंतर्गत मंडल अध्यक्ष स्तरावरील (सध्याचे व माजी वरिष्ठ कार्यकर्ते) कार्यकर्ते गाव आणि शहरातील वॉर्डांमध्ये भेटी देतील.

14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जयंतीनिमित्त पक्षाने 13 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये 13 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची स्वच्छता आणि दीपप्रज्वलन कार्यक्रम होईल. 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.

15 ते 25 एप्रिल दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात दोन सत्रांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंडल स्तरावर बाबासाहेबांच्या पुतळ्यांचे चिन्हांकन आणि 13 व 14 एप्रिलच्या अन्यही इतर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.

BJP Foundation Day
Kalpana Chumbhale Politics : पिंगळेंच्या कार्यकाळातील निर्णय रद्द करण्याचा चुंभळेंकडून धडाका, आता 'तो' निर्णयही रद्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com