West Bengal election news : मतदानाच्या काही तास आधीच ममतादीदींना मोठा धक्का; भाजपने विद्यमान आमदारालाच फोडले...

Khagendra Nath Mahato BJP, TMC MLA joins BJP Bengal : बंगालमध्ये आज १५२ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये उत्तर बंगाल, पश्चिम बंगाल आणि दक्षिण बंगालमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे.
TMC MLA Khagendra Nath Mahato joins BJP
TMC MLA Khagendra Nath Mahato joins BJPSarkarnama
Published on
Updated on

West Bengal politics news : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये काँटे की टक्कर आहे. दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात प्रचारात टोकाचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच भाजपने मतदानाच्या काही तास आधाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार झटका दिला आहे.

एकीकडे पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसचे विद्यमान आमदार खगेंद्रनाथ महातो यांनी बुधवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. ते झारग्राम जिल्ह्यातील गोपीबल्लवपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत महातो यांचा पक्षप्रवेश झाला.

महातो यांना ममता बॅनर्जी यांनी विधानसभेचे तिकीट नाकारले होते. त्यामुळे ते सुरूवातीपासूनच नाराज होते. मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते नाराजी व्यक्त करत होते. अखेर बुधवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. महातो हे प्रसिध्द डॉक्टर असून त्यांनी तृणमूल काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि कुप्रशासनाविरोधात लढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अधिकारी यांनी सांगितले.

TMC MLA Khagendra Nath Mahato joins BJP
Maharashtra E-challan news : ई-चलन वसुलीतील पोलिसांच्या गैरप्रकारांवर सरकार घालणार मोठा घाव; थेट गृह विभागातून निघाला आदेश...

महातो यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगत अधिकारी म्हणाले, भाजपचे उमेदवार आधीच जाहीर झाले आहेत आणि प्रचारही संपला आहे. महातो यांनी कोणत्याही अटींशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाच्या कामाची पध्दत भावली आहे. त्यांना कोणताही राजकीय लाभ नको असल्याचे अधिकारी यांनी स्पष्ट केले.

TMC MLA Khagendra Nath Mahato joins BJP
CP Radhakrishnan news : भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव, त्यातच उपराष्ट्रपती थेट समोरासमोरच भडकले; खर्गे अडचणीत...

दरम्यान, महातो यांच्या भाजप प्रवेशावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. महातो यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीवर कसलाही परिणाम होणार नाही, असे टीएमपी नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बंगालमध्ये आज १५२ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये उत्तर बंगाल, पश्चिम बंगाल आणि दक्षिण बंगालमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. उर्वरित १४२ मतदारसंघांमध्ये २९ एप्रिलला मतदान असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com