

West Bengal BJP Government Action On Madrasa News : पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने राज्यातील मदरशांबाबत कडक धोरण आखत तब्बल 250 हून अधिक मदरसे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर आणखी 100 मदरशांमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या घोषणेनंतर पंचायत राज मंत्री दिलीप घोष यांनी, पश्चिम बंगालमधील काही मदरशांबाबत संशय व्यक्त केला आहे. तर या मदरशांचा दहशतवादी हल्ल्यांशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. घोष यांच्या या दाव्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
घोष यांनी, राज्यात केलेल्या सर्व्हेनंतर 252 मदरशांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर आणखी 100 मदरशांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून, येथे गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळल्याचे कारण दिले आहे. येथील मदरशांमध्ये बांगलादेशमधून येणारे आतंकवादी आश्रय घेत होते. यावर अनेकदा अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पण कोणीच काहीच केलं नाही. पण आता आम्ही त्यावर काम करणार आहोत, असेही मंत्री घोष यांनी म्हटले आहे. मात्र या कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान अल्पसंख्याक आणि मदरसा शिक्षण विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. मंत्री क्षुदीराम टुडू यांनी, ज्या मदरशांकडे मंजुरी असेल ते आपले काम करू शकतात, असे म्हटले आहे. तर जूनच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाकडून याबाबत सर्व्हे करण्यात आला आहे. याचा उद्देश हा सरकारी आणि खासगी मदरशांमध्ये पायाभूत सुविधा, मंजुरीची स्थिती आणि व्यवस्थापन प्रणालीचे मूल्यांकन करण्याचा होता, असेही असे म्हटले आहे.
टुडू यांनी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विविध जिल्ह्यांमधील अधिकृत आणि अनधिकृत मदरशांची संख्या निश्चित केली जात आहे. त्याअंतर्गत 252 मदरशांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यक मंजुरी आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे इतर 100 मदरशांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, आता या सरकारच्या भूमिकेवर तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी मदरसा हीदेखील एक शिक्षणव्यवस्था असून, सर्व मदरशांना दहशतवादाशी जोडणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.