BJP Government : आमदार-खासदार गयावया करता, तरी कामे होत नाहीत! मोदींच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या बड्या नेत्याची उघडपणे नाराजी

Vijay Goel, Delhi government officials : माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांची दिल्लीतील ढिम्म प्रशासनावर थेट टीका; आमदार-खासदारांना अधिकाऱ्यांकडे गयावया करूनही कामे न होण्याची तीव्र खंत.
PM Narendra Modi, Vijay Goel
PM Narendra Modi, Vijay GoelSarkarnama
Published on
Updated on

Government officers : भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी आपल्यास सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी आमदार-खासदारांना गल्लीत, रस्त्यांवर धक्के खावे लागत असल्याची नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

विजय गोयल यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विविध पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत. एकप्रकारे ढिम्म प्रशासनावर निशाणा साधताना त्यांनी सरकारलाही धारेवर धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विजय गोयल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिल्ली महानगरपालिका आणि सरकारी अधिकारी काम करत नाहीत. त्यांच्याकडून कामे करून घेण्यासाठी खासदार, आमदार तसेच नगरसेवकांना गल्लीबोळात, रस्त्यांवर धक्के खात फिरावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेची कोण दखल घेणार, असा थेट सवाल गोयल यांनी केला आहे.

PM Narendra Modi, Vijay Goel
Rahul Gandhi news : राहुल गांधींची जीवापाड मेहनत, पण बहीण प्रियांका गांधींसह पक्षातील प्रमुख नेत्यांचीच मिळेना 'सोशल' साथ; धक्कादायक वास्तव समोर...

एखाद्या ठिकाणचा कचरा उचलला तर फार मोठे काम करून घेतल्यासारखे वाटते. पण अधिकारी असताना कचरा साठतोच कसा, हा विचार कुणीच करत नाही. ओढे, रस्ते, वीज, पाणी, गटारे यासारख्या समस्यांसाठी लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे गयावया करतात, तरीही कामे होत नाहीत, अशी खंत गोयल यांनी बोलून दाखविली आहे.

PM Narendra Modi, Vijay Goel
Devendra Fadnavis news : मंत्रालयात अधिकाऱ्यांची उसनवारी, प्रतिनियुक्तीवर CM फडणवीसांचा घाव; सर्व नेमणुका रद्द करण्याचे आदेश, परवानगी न घेतल्यास थेट कारवाई

दरम्यान, विजय गोयल हे तीनवेळा लोकसभा आणि एकदा राज्यसभेचे सदस्य होते. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे. भाजपमध्ये अनेक महत्वाच्या संघटनात्मक पदांवरही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीला महत्व प्राप्त झाले आहे. दिल्लीत मागील अनेक वर्षांनंतर भाजपची सत्ता आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com