भाजपमधील आऊटगोईंग सुरूच; आमदार कल्याणींनी दिला धक्का

भाजपमधील आऊटगोईंग अजूनही सुरूच आहे.
BJP
BJPsarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये भाजपमधील आऊटगोईंग अजूनही सुरूच आहे. आमदार, खासदारांसह अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रामराम ठोकला आहे. हे सर्व नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. ही रांग अद्याप संपलेली नसून बुधवारी आणखी एका आमदाराने तृणमूलमध्ये प्रवेश केला.

रायगंज मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कृष्णा कल्याणी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली होती. त्याआधी भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पक्षाच्या खासदार व माजी केंद्रीय मंत्री देबश्री चौधरी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर कल्याणी यांनी थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

BJP
ज्ञानदेव वानखेडेंची कबुली; निकाहनामा खरा पण...

त्यानंतर बुधवारी पश्चिम बंगालमधील मंत्री व तृणमूलचे ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत कल्याणी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून त्यांच्या तृणमूल प्रवेशाची चर्चा सुरू होती. त्यावेळी कल्याणी म्हणाले होते की, 'देबश्री चौधरी यांच्याकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या ज्या पक्षात असतील त्या पक्षात मी काम करू शकत नाही.'

महिनाभरापूर्वी बोलताना त्यांनी जे नेते पक्ष सोडत आहेत, त्यांच्या तक्रारींनी पक्षाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही, असं सांगितलं होतं. मी पक्षाच्या सर्व कार्यक्रमांतून अंग काढून घेतलं आहे. तसेच केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी डेडलाईन दिली आहे, असंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. भवानीपूरसह तीन मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान, भाजपचे खासदार बाबुल सुप्रिया यांनी भाजपला धक्का देत काही दिवसांपूर्वीच तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच आमदार मुकूल रॉय यांच्यासह चार भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश करत भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ कमी होत चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच, खासदारकीचाही राजीनामा देण्याचीही घोषणा केली होती. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता. अशा प्रकारे त्यांनी पक्षालाच तोंडावर पाडले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com