आता यूपीतही 'खेला होबे'! अखिलेश यांच्यासाठी ममतादीदी उतरल्या मैदानात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मतात बॅनर्जी यांची भाजपवर टीका.
Mamata Banerjee, Akhilesh Yadav
Mamata Banerjee, Akhilesh Yadavsarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या मदतीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही (Mamata Banerjee) उतरल्या आहेत. ममतांनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेत सपाला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच या निवडणुकीत सपाला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रभावी ठरेली घोषणा 'खेला होबे'ची घोषणा बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातही दिली आहे.

या वेळी बॅनर्जी म्हणाल्या, युपीमध्ये एनआरसीच्या वेळी एन्काऊंटरच्या नावावर किती लोकांना मारण्यात आले हे आम्ही पाहिले. खोट्या चकमकींमध्ये लोकांना मारण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. कायद्याप्रमाणे काम करायला हवे. भाजपने इतिहास बदलण्याचे काम केले आहे. भाजपने शहीद ज्योत नष्ट करण्याचे काम केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी खेळ सुरु केला असल्याचा आरोप त्यांनी केला.

Mamata Banerjee, Akhilesh Yadav
पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्यावर नाराज नाही पण हैराण झाले! सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

शेतकरी आंदोलन करत होते. भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारले. यासाठी भाजपने माफी मागितली पाहिजे. युपीमध्ये कोरोनामुळे लोक मरत होते तेव्हा योगी कोठे गेले होते. त्या लोकांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. लोकांना मृतदेह गंगा नदीत सोडण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली, यासाठी जनतेची माफी मागा असे बॅनर्जी म्हणाल्या.

मोदी म्हणतात आम्ही यूपीला पैसे दिले, तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे दिले का, हे सर्व पैसे राज्यांकडूनच मिळतात. ते जनतेचे पैसे आहे. सकाळी ब्राह्मण समाजाचे लोक मला भेटायला आले होते. त्यांनी मी आल्यानंतर अखिलेश यादव यांना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे सांगितले, असेही त्यांनी नमूद केले.

Mamata Banerjee, Akhilesh Yadav
सर्व पिकांना MSP, मोफत शिक्षण आणि लॅपटॉप; समाजवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

या वेळी अखिलेश यादव म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी सत्यमेव जयतेचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले. सर्व धर्मांध शक्तींना पराभूत करण्याचे काम केले. तुम्ही बंगालमध्ये ऐतिहासिक लढाई केली यासाठी मी तुम्हाला आणि बंगालच्या जनतेला धन्यवाद देतो. आपली गंगा-जुमनी परंपरा आहे. त्याला बंगालच्या जनतेने पुढे नेले आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com