Congress News : बंगालमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते ‘अधीर’; खर्गेंच्या फोटोला फासले काळे

Mallikarjun Kahrge News : इंडिया आघाडीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ, या ममतांच्या विधानावर अधीर यांनी टीका केली होती. त्यावर खर्गे यांनी अधीर यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
West Bengal Congress Poster
West Bengal Congress PosterSarkarnama

West Bengal Congress News : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसमधील (Congress News) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ, असे विधान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममतांवर विश्वास ठेवता येणार नाही, असे म्हटले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अधीर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना थेट कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे बंगालमध्ये खर्गे यांच्याविरोधातच नाराजी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मल्लिकार्जून खर्गे आणि अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्यामध्ये ममतांबाबत दोन वेगळ्या भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून कोलकातामध्ये रविवारी काँग्रेस भवनमधील खर्गे यांच्या फोटोला काळे फासल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बंगालमध्ये अधीर रंजन यांच्याकडून सातत्याने ममतांवर (Mamata Banerjee) टीकास्त्र सोडले जात आहे. (Latest Political News)

West Bengal Congress Poster
Adhir Ranjan Chowdhury : ममता बॅनर्जींशी लढायचं असेल तर आमच्याकडे या; काँग्रेसच्या चौधरींना भाजपची ऑफर!

कोलकाता (Kolkata) विधान भवनसमोर काँग्रेसचे अनेक फलक लावण्यात आले आहे. त्यावर खर्गे यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधीचे फोटोही आहेत. रविवारी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनीच केवळ खर्गे यांच्या फोटोला काळे फासले. हा प्रकार समोर येताच इतर कार्यकर्त्यांनी काळे फासलेले फलक काढून टाकले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकं काय आहे प्रकरण?

देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर टीएमसी त्यांना बाहेरून पाठिंबा देईल, असे ममतांनी नुकतेच जाहीर केले आहे. या वक्तव्यावर अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी टीका केली होती. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी भाष्य केले.

खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले होते की, 'अधीर रंजन चौधरी निर्णय घेणार नाहीत, आम्ही निर्णय घेऊ, काँग्रेस पक्ष निर्णय घेईल. आम्ही हायकमांड आहोत. ममता बॅनर्जी सुरुवातीपासूनच बाहेरून पाठिंबा देत आल्या आहेत. बाहेरून पाठिंबा मिळणे ही नवीन गोष्ट नाही."

खर्गे यांच्या प्रतिक्रियेनंतरही चौधरी यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी म्हटले की, माझा ममतांविषयी व्यक्तिगत द्वेष नाही. मी त्यांच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करतो. मला आणि माझ्या पक्षाला बंगालमध्ये संपवू पाहत असलेल्या व्यक्तीच्या बाजूने मी बोलू शकत नाही. ही प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची लढाई आहे. मी या कार्यकर्त्यांच्या बाजूने बोलत आहे.

West Bengal Congress Poster
Uttar Pradesh News : राहुल गांधी- अखिलेश यादवांच्या उपस्थितीने जमाव अनियंत्रित ; चेंगराचेंगरीची शक्यतेने सभा रद्द...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com