Assembly Election update : PM मोदी बंगालमध्ये असतानाच भाजपला धक्का; निवडणुकीच्या धामधुमीत बड्या नेत्याचा ममतादीदींच्या पक्षात प्रवेश

Chandra Kumar Bose joins TMC : भाजप हा पक्ष संविधानविरोधी आहे. कारण मतांच्या राजकारणासाठी समाजामध्ये दुही निर्माण करून सत्ता मिळविणे, हा त्यांचा एककलमी अजेंडा आहे, अशी टीका चंद्र कुमार बोस यांनी केली.
Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
Amit Shah, Narendra Modi, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal election news : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजपच्या उमेदवारांसाठी भरगच्च सभा घेतल्या जात आहेत. यावेळी तृणमूल काँग्रेसची सत्ता जाणार, असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. रविवारीही त्यांची बंगालमध्ये सभा झाली. एकीकडे त्यांच्या सभांचा धडाका सुरू असतानाच रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते अनेक वर्षे भाजपमध्ये होते. २०२३ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत तृणमूलमध्ये प्रवेश करत भाजपला धक्का दिला आहे.

तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर बोस यांनी भाजपला जोरदार हल्ला चढविला. मागील काही दिवसांपासूनच ते सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करणे ही आपली चूक होती, असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले. रविवारी त्यांनी भाजपची तुलना इंग्रजांशी केली.

Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
Maratha protest cases : शासकीय संपत्तीचे नुकसान, सुप्रीम कोर्टाचे निर्देश! मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान

भाजप हा पक्ष संविधानविरोधी आहे. कारण मतांच्या राजकारणासाठी समाजामध्ये दुही निर्माण करून सत्ता मिळविणे, हा त्यांचा एककलमी अजेंडा आहे. इंग्रजीचे धोरणही असेच होते. इंग्रजांप्रमाणे भाजपही आपली धोरणे राबवत आहे. त्यांनी धर्माला राजकारणात आणले. आपले आजोबा सरत चंद्र बोस आणि त्यांचे बंधू नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा त्याला विरोध होता, अशी टीका चंद्र कुमार बोस यांनी केली.

भाजप ज्यापध्दतीने विचार करते, ते मी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेच कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. टीएमसी हा पक्ष शाश्वत आणि धर्मनिरपेक्षा विचारसरणीच्या जवळ जाणार असल्याचे मला दिसून आले. त्यामुळे आज टीएमसीमध्ये प्रवेश केल्याचे चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट केले. ते नऊ वर्षे भाजपमध्ये होते.

Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
State Commission for Women : मोठी बातमी : राजकीय पक्षाच्या अध्यक्षालाच हवे महिला आयोगाचे अध्यक्षपद; वेळप्रसंगी 'राष्ट्रवादी'त प्रवेश करण्याचे संकेत

बंगालमध्ये टीएमसीचाच विजय होईल, असा विश्वासही बोस यांनी व्यक्त केला. दरम्यान, बंगालमध्ये २३ एप्रिल आणि २९ एप्रिल असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. प्रमुख लढत भाजप आणि तृणमूलमध्ये होणार आहे. काँग्रेसने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच एकला चलोची भूमिका घेत सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com