Former Congress MP Sajjan Kumar : शीखविरोधी दंगली प्रकरणात कांग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; तब्बल 41 वर्षांनी निकाल

Anti Sikh Riots News : शीखविरोधी दंगली प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात 18 फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असून सज्जन कुमार सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
Former Congress MP Sajjan Kumar
Former Congress MP Sajjan KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना 1984 मध्ये शीखविरोधी दंगलीप्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात 18 फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सध्या सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या प्रकरणात दिल्ली न्यायालयात सुनावणी पार पडली असून तब्बल 41 वर्षांनी निकाल देण्यात आला आहे.

...पण न्याय मिळाला 1994 च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार कुमार यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर याप्रकरणी शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणात 41 वर्षांनी न्याय मिळाला आहे. 40 वर्षापूर्वी शीख हत्याकांडाचे नेतृत्व सज्जन कुमार यांनी केले होते.

आता त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांना शिक्षाही होईल. यासाठी आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सत्तेत येताच एसआयटी स्थापन केल्याबद्दल त्यांचेही आभार मानत असल्याचे जगदीप सिंग यांनी म्हटलं आहे. तर जगदीश टायटलर प्रकरणातही आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

त्यांनी नरसंहार केला : मनजिंदर सिंग सिरसा

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी देखील या प्रकरणावरून प्रतिक्रिया देताना, न्यायालयाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. त्यांनी नरसंहार केला. आता काँग्रेसचे सर्व पाप उघडकीस येत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानतो ज्यांनी एसआयटी स्थापन केली आणि या लोकांना तुरुंगात टाकले. आज देवाने न्याय दिला. सज्जन कुमार दोषी आहे याबद्दल आम्हाला खात्री होतीच.

Former Congress MP Sajjan Kumar
Jagdish Tytler : शीखविरोधी दंगलप्रकरणी आरोप निश्चित झालेले काँग्रेस नेते जगदीश टायटलर कोण?

नेमकं प्रकरण काय?

1984 च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित सरस्वती विहार प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण 1 नोव्हेंबर 1984 चे असून पश्चिम दिल्लीतील राज नगर भागात राहणाऱ्या सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुणदीप सिंग या पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. दंगलखोरांनी पीडितांच्या घरावर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला चढवला होता.

Former Congress MP Sajjan Kumar
Jagdish Tytler : शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधात CBIचे आरोपपत्र ; नवा पुरावा दाखल

जमावाचे नेतृत्व सज्जन कुमारांनी केलं

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जमावाचे नेतृत्व तत्कालीन काँग्रेस खासदार सज्जन कुमार करत होते, जे त्यावेळी बाह्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यावर असा आरोप आहे की सज्जन कुमारने जमावाला हल्ला करण्यास प्रवृत्त केले, त्यानंतरच सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुणदीप सिंग यांना त्यांच्याच घरात जिवंत जाळण्यात आले. एवढेच नाही तर जमावाने घराची तोडफोड, लूटमार केली. आणि घराला आग लावली. या घटनेशी संबंधित एफआयआर उत्तर दिल्लीतील सरस्वती विहार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला होता, जो रंगनाथ मिश्रा आयोगासमोर ठेवण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com