Jitendra Tyagi : मुस्लिमांनो सनातन धर्मात या! शिया वक्फ बोर्डाचा माजी अध्यक्ष म्हणतो, 'दरमहा तीन हजार देतो'

Hinduism Conversion in Maahakumbh : सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरला आहे. येथे अनेक जण सन्यास घेताना दिसत आहेत. यात सध्या अभिनेत्री ममता कुलकर्णी वादाच्या भौवऱ्यात सापडली आहे.
Jitendra Tyagi
Jitendra TyagiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात विविध आखाड्यांमध्ये यंदा 7000 हून अधिक महिलांनी संन्यास घेतला आहे. एका अधिकृत निवेदनानुसार जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, श्री पंचदशनम आवाहन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुण गिरी आणि वैष्णव संतांच्या धार्मिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली सनातनमध्ये या महिलांनी संन्यासाची दीक्षा घेतली आहे. अशातच एका बातमी नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी धर्म परिवर्तन करून जितेंद्र नारायण त्यागी झाले आहेत. त्यांनी मुस्लीम समाजाला घर वापसीचे खुले आवाहन केले आहे.

शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मंगळवारी (ता.11) कुंभमेळ्यात संगमावर स्नान केले. त्यांनी इस्लाम सोडून सनातन धर्म 3 वर्षांपूर्वी सनातन धर्म स्वीकारला होता. यानंतर आता त्यांनी, सनातन धर्म स्वीकारणारा असे आवाहन केले आहे. तसेच जे मुस्लिम धर्म परिवर्तन करतील त्यांना महिन्याला तीन हजार रुपये देण्याची घोषणाही केली. तसेच उद्योगासाठीही मदत केली जाईल, असेही आश्वासन त्यागी यांनी दिले आहे.

त्यांगी यांनी यावेळी, आज संगमात स्नान करून आनंद होत असून ही पवित्र भूमी आहे. याच पवित्र भूमीवरून आपण देशातील मुस्लिमांना अनुरोध करत आहोत की त्यांनी घर वापसी करावी. मुस्लिमांनी सनातन धर्माकडे वळावे. त्यांनी धर्म परिवर्तनाचा विचार करावा असे आवाहन केले आहे.

Jitendra Tyagi
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याबाबत दुखावलेल्या मंत्री, आमदारांची का होतेय मनधरणी?

तसेच याबाबत आपण एक संघटना तयार करत असून या संघटनाच्या माध्यमातून ते मुस्लिमानांने धर्म परिवर्तन करून घेतील. तर जे मुस्लिम घरवापसी करतील त्यांना प्रति महिना तीन हजार रूपये देण्यात येतील. तसेच जे धर्म परिवर्तन करतील त्यांना व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्यासाठी मदत केली जाईल.

Jitendra Tyagi
Kumbh Mela 2025 : संगम नोज घाटावरचं महाकुंभमेळ्यात का होते इतकी गर्दी?

त्यागी यांनी, मुस्लिम समाजाला कट्टरपंथी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल असे म्हटले आहे. आनंदाने सनातन धर्मात परत या. सनातन धर्म तुमचे स्वागत करेल. सनातन धर्म जगातील सर्वात जुना धर्म असून सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण झाल्याचे म्हटलं आहे. तीन वर्षांपूर्वी रिझवी यांनी, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांच्याकडून सनातन धर्माची दीक्षा घेतली होती. त्यावेळी त्यांना जितेंद्र नारायण सिंह त्यागी असे नाव देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com