Purnesh Modi : मोदी आडनावाबाबत 2019 मध्ये कर्नाटकात केलेल्या विधानासंदर्भात गुजरातमधील सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना तात्काळ जामीनही मिळाला आहे. कर्नाटकात राज्यात २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात वक्तव्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की, 'सर्व चोरांचे नाव मोदीच का?' राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी गुन्हा दाखल केला होता.
कोण आहेत पूर्णेश मोदी?
पूर्णेश मोदी यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1965 रोजी गुजरातमधील सुरत शहरात झाला. पूर्णेश मोदी हे सुरत पश्चिम येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. पूर्णेश मोदीं कडे बीकॉम आणि एलएलबीची पदवी आहे. पूर्णेश मोदी हे व्यवसायाने वकील आहेत. ते गुजरात सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.
2013 मध्ये सुरत पश्चिम येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर भाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. किशोर भाईंच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने इथे पोटनिवडणुकीत पूर्णेश मोदी यांना तिकीट दिले आणि निवडणूक जिंकून गुजरातच्या तेराव्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडून आमदार झाले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा पूर्णेश मोदींना तिकीट दिले आणि ते पुन्हा एकदा ही जागा जिंकून आमदार झाले.
पूर्णेश मोदींनी 2017 च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. तेव्हाच्या निवडणुकीत पूर्णेश मोदींसमोर काँग्रेसचे इक्बाल पटेल होते. त्यांना 33 हजार 733 मते मिळाली, तर पूर्णेश मोदी यांना 1 लाखांहून अधिक मते मिळाली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.