Abdul Sattar News: संजय राऊत यांचा नातु आला तरी सरकार येणार नाही!

Abdul Sattar On Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, तरच त्यांचे सरकार येईल, असा दावा सत्तार यांनी केला.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

Nandurbar News: पुढची गुढी आपलीच असणार, असे म्हणणारे उद्धव ठाकरे (Shivsena) गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून दाखवावे, त्या वेळेस तुमचे सरकार येईल, असा टोला लगावत अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला. (Abdul Sattar said Sanjay Raut is a limited capacity leader)

नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीच्या पाहणीसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी आले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय शीघ्रगतीने निर्णय घेतले आहेत.

Abdul Sattar
APMC Politics; शिंदेंची शिवसेना बाजार समितीच्या रिंगणात?

ते म्हणाले, की राऊत आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत. त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारावे आणि पुन्हा निवडून दाखवावे. त्या वेळेस तुमचे सरकार येईल आणि राऊत यांनी राजीनामा दिला नाही तर दोन-चार पिढ्या यांचे सरकार येणार नाही.

अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत सातत्याने काही ना काही बोलत असतात. आमच्यावर आरोप करीत असतात. असे आरोप केले नाही तर त्यांची कोणीही दखल घेणार नाही याची त्यांना जाणीव असावी. त्यामुळेच ते असे आरोप करीत असावेत. मात्र संजय राऊत यांचा नातू जरी आला तरी त्यांचे सरकार येणार नाही.

Abdul Sattar
Abdul Sattar; बांधावर गेलेल्या सत्तारांचे मदतीबाबत तोंडावर मात्र बोट!

श्री. सत्तार पुढे म्हणाले, राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर केलल्या आरोपांनाही सत्तारांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की राऊत कधीच खरे बोलत नाहीत, त्यामुळे दादा भुसे यांनी दिलेल्या चॅलेंजमुळे मिरची लागत आहे. राऊत बोटावर मोजण्याइतक्या आमदार-खासदारांचे नेते आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोलावे अन्यथा आम्हीही बोलू शकतो, राऊत यांनी ज्यांचे नमक खाल्ले आहे त्यांची तरी जाण ठेवावी, अशी टीका सत्तार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com