Karnataka New Chief Minister News: कर्नाटकात काँग्रेसने बहुमतापेक्षाही जास्त जागा मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर या दणदणीत विजयामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण पसरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आज (१४ मे)काँग्रेसकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करणार आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. (Who will be the new Chief Minister of Karnataka? These two names are preferred by party elites)
दरम्यान, कर्नाटक (Karnataka Election result 2023) जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सभा आणि रॅली करत जंगजंग पछाडले होते. पण कर्नाटकच्या जनतेने भाजपला हद्दपार करत पुन्हा एकदा काँग्रेससाठी दारे खुली केली.चार महिन्यात काँग्रेसचा हा दुसरा ऐतिहासिक विजय आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतही काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. हिमाचलप्रदेश पाठोपाठ कर्नाटकातही झालेल्या या विजयामुळे या वर्षाअखेरीस होणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकासाठी काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही मोठा प्रभाव या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivkumar) हे या विजयाचे किंगमेकर ठरले. आता मुख्यमंत्रीपदासाठीही या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून १९८५ पासूनची सत्तापालटाची परंपराही कर्नाटकच्या जनतेने कायम ठेवली आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे दोघेही आहेत. या दोघांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलवले आहे. (Karnataka Elctions result 2023 latest news Update)
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, पण पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात ही परंपरा मोडली. दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन निवडणुकीपूर्वीच संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसने ही भूमिका घेतली होती. "काँग्रेसची सत्ता आली तर नेते ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार,' असे मलिक्कार्जून खर्गे यांनी सांगितले होते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.