Assembly Election Survey : मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये कुणाचं सरकार येणार; काय सांगतो ताजा सर्व्हे ?

MP, Rajasthan, Chhattisgarh Election Opinion Poll : तिन्ही राज्यात एक समान सूत्र...
Assembly Election Survey
Assembly Election SurveySarkarnama

Survey News : येणाऱ्या नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये देशातील पाच महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या निवडणुका आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या तिन्ही राज्यांबाबत निवडणूकपूर्व विधानसभा जागांचा अंदाज एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. (Latest Marathi News)

मागील महिन्यात भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे या हिंदीबहुल पट्ट्यातील तिन्ही राज्यांमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, निवडणुकांना दोन-तीन महिन्यांचा कालावधी बाकी असताना आता एक सर्वेक्षणातून निवडणुकांच्या अंदाजाबाबत ताजी आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणात या तिन्ही राज्यातील जनतेची मते जाणून घेण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीत कोणाचे सरकार या राज्यांमध्ये येऊ शकते? याबाबत सर्वेक्षणातून अंदाज व्यक्त करण्यात आले आहे.

Assembly Election Survey
Rohit Pawar Nagpur Daura : 'साहेबांचा संदेश' घेऊन रोहित पवार विदर्भात; प्रफुल्ल पटेलांच्या गडालाही सुरुंग लावणार ?

मध्य प्रदेशात कमळ फुलणार -

IANS-Pollstrat या संस्थेने मध्य प्रदेशातील 7,883 लोकांचे मत सर्वेक्षणात घेतले आहे. यासर्वेक्षणाच्या दाव्यानुसार मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभेच्या एकूण 230 जागांपैकी भाजपला 116 ते 124 जागा मिळू शकतात, असा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ 104 जागा मिळतील असे निष्कर्ष नोंदवण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील जनतेने लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांना सर्वाधिक मतदान केले आहे. एकूण 40 टक्के लोकांना चौहान पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते.

राजस्थानमध्ये गेहलोत यांचीच जादू -

IANS-Pollstrat ने राजस्थानमधील 6,705 लोकांच्या सहभागातून सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार राजस्थानमधील विधानसभेच्या 200 जागांपैकी काँग्रेसला 97 ते 105 जागा मिळण्याचा अंदाज सांगितला गेला आहे. याचाच अर्थ राज्यात काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तर या उलट भाजपला राजस्थानमध्ये 89 ते 97 जागा मिळू शकतात. सर्वेक्षणात लोकांना त्यांचा आवडता मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारल्यानंतर अशोक गेहलोत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. सर्वेक्षणातील सहभागी लोकांपैकी 38 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून गेहलोत यांना पसंती दर्शवली.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार आहे :

छत्तीसगडमध्ये IANS-Pollstrat ने एकूण 3,672 लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार आहे. छत्तीसगडमधील विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेसला 62 जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ 27 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Assembly Election Survey
Gokul Dudh Annual Meeting : गोकुळच्या सभेत आज काय होणार ? कोण कोणाला कसे उत्तर देणार

तिन्ही राज्यांमध्ये एक गोष्ट समान -

IANS-Pollstrat सर्वेक्षण पाहिले तर तिन्ही राज्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. सद्या तिन्ही राज्यातील सत्ताधारी पक्षच पुन्हा सत्तेत येण्याचा अदाज आहे. तिन्ही राज्यात विद्यमान सरकार पुन्हा सत्तेत येणार असा अदाज सांगितला गेला आहे.

मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे, तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या सर्वेक्षणानुसार आगामी निवडणुकीतही मध्यप्रदेशात कमळ फुलण्याची शक्यता आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com