Gokul Dudh Annual Meeting : गोकुळच्या सभेत आज काय होणार ? कोण कोणाला कसे उत्तर देणार

Kolhapur Gokul Dudh Sangha : गोकुळ दूध संघाच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागून राहिल्याने सकाळपासूनच या सभेची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढू लागली आहे.
Kolhapur Gokul Dudh Sangha
Kolhapur Gokul Dudh Sangha Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : गोकुळ दूध संघाच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागून राहिल्याने सकाळपासूनच या सभेची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढू लागली आहे. गोकुळची सभा आणि गोंधळ हे समीकरण काही नवीन नाही. त्यामुळे आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्या वार्षिक सभेत विरोधकांचा माईक बंद करण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांना प्रश्न विचारता आले नाहीत, असा आरोपही विरोधकांनी केला होता. या सभेत मात्र विरोधकांनी सत्याधार्‍यांना घेरण्यासाठी चांगलीच तयारी केल्याचं दिसून येत आहे.

Kolhapur Gokul Dudh Sangha
Ahmednagar Political News: शिवाजी कर्डिलेंना तडीपार करा ; गुन्हा दाखल न झाल्याने आमदार तनपुरे संतापले !

सत्ताधाऱ्यांना सुरुवातीपासूनच आपल्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेला आहे. सभा स्थळांच्या एंट्रीपासूनच उत्तर द्या! अशा आशयाचे फलक जागोजागी झळकवले आहेत. रिजेक्ट केलेल्या दुधाचे पैसे कोणाच्या खिशात जातात? दोन वर्षात किती लीटर वासाचे दूध परत केले? कर्मचाऱ्यांवर म्हशी घेण्याचा दबाव का? कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवणार का? भविष्य निर्वाह निधी देणार का? दोन वर्षात संघांच्या ठेवीमध्ये 73 कोटींची गट का झाली? सत्ताधाऱ्यांनो उत्तर द्या, अशा आशयाचे फलक लावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे.

एकूणच सभेच्या ठिकाणी प्रश्न विचारायला सत्ताधाऱ्यांनी वेळ न दिल्यास विरोधकांचा हा प्लॅन सभासदांच्या वर किती प्रभाव टाकतोय हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी एक वाजता कागलच्या पंचतारांकित एमआयडीसीमध्ये महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे पार पडत आहे. वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Kolhapur Gokul Dudh Sangha
Pune BJP Political News : मुरलीधर मोहोळांना 'ओव्हरटेक' करत श्रीनाथ भिमाले दिल्लीला जाणार का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com