Rahul Gandhi Jaipur News : लग्न का करत नाही, पंतप्रधान झाल्यास काय करणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींनी दिली उत्तरं

India's Most Eligible Bachelors : काँग्रेस खासदार यासोबतच राहुल गांधी यांची संपूर्ण देशात इंंडियाज मोस्ट इलिजिबल बॅचरल अशीही ओळख आहे.
Rahul Gandhi Jaipur News :
Rahul Gandhi Jaipur News : Sarkarnama
Published on
Updated on

Jaipur Congress Politics : काँग्रेस खासदार यासोबतच राहुल गांधी यांची संपूर्ण देशात इंंडियाज मोस्ट इलिजिबल बॅचरल अशीही ओळख आहे. त्यांच्या चाहत्यांपासून विरोधकांनाही त्यांचं लग्न कधी होणार, असा प्रश्न पडलेला असतो. अनेकदा जाहीर सभा, कार्यक्रमांमध्येही त्यांना लग्नाबद्दल विचारल्याचं आपण पाहिलं आहे. अशातच त्यांना पुन्हा एकदा जाहीरपणे त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे.

राहुल गांधींनी शनिवारी जयपूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांना त्यांच्या लग्नापासून त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि राहुल गांधींनीही त्यांना तितक्याच सहजतेने उत्तरेही दिली.

Rahul Gandhi Jaipur News :
Ajit Pawar News : 'लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू' म्हणणाऱ्या पडळकरांच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, 'वाचाळवीरांकडे मी लक्ष देत नाही...'

विद्यार्थिनींनी राहुल गांधींना त्यांनी अजून लग्न न करण्याचे कारण काय? यावर राहुल गांधी म्हणाले, आपण सध्या काँग्रेसला पुढे नेण्यात व्यस्त असून, ही माझी पहिली प्राथमिकता आहे. आपण स्वत:ला पक्षाला समर्पित केले आहे. त्यामुळे आपल्याकडे लग्नासाठी वेळ नाही.

या वेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या चमकदार त्वचेचे रहस्य काय आहे. तुम्ही चेहऱ्याला काय लावता? असाही प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी कधीही चेहऱ्यावर साबण किंवा सौंदर्य प्रसाधने लावत नाही. चेहरा फक्त पाण्याने साफ करतो. याशिवाय जेवणात मला कारले आणि वाटाणे अजिबात आवडत नाहीत, असंही त्यांनी या वेळी सांगितलं.

विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारले की, ते पंतप्रधान झाल्यास पहिले काय करणार? त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी पंतप्रधान झालो तर देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी संजीवनी देईल. छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देईल. सध्या काही कॉर्पोरेट आणि व्यावसायिक घराण्यांनी बँकांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळू शकत नाही. अशा छोट्या उद्याजकांना कर्ज लवकरात लवकर मिळावे, अशी व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Rahul Gandhi Jaipur News :
Jalgaon Politics: ‘संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजन जळगावकरांसाठी निरूपयोगी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com