Ajit Pawar News : 'लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू' म्हणणाऱ्या पडळकरांच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, 'वाचाळवीरांकडे मी लक्ष देत नाही...'

Ajit Pawar slams Gopichand Padalkar : अशा विधानावर मत व्यक्त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
Ajit Pawar-Gopichand Padalkar
Ajit Pawar-Gopichand Padalkarsarkarnama
Published on
Updated on

Pimpri : "धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत," अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. पडळकरांच्या टीकेला आज (रविवारी) अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं.

"राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अशा विधानावर मत व्यक्त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा गोष्टीकडे मी लक्ष देत नाही. त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी माझ्यावर कामावर लक्ष देतो," अशा शब्दांत अजितदादांनी पडळकरांवर बोलणं टाळलं.

Ajit Pawar-Gopichand Padalkar
Manoj Jarange News : मनोज जरांगे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; मराठा समाजाच्या बैठकीत मोठा निर्णय; पुढील लढ्याबाबत महाराष्ट्रभर...

मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत काय त्रुटी राहिल्या याच्यावर चर्चा करण्यात येत आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, याचा विचार सुरू आहे,"

आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत असले पाहिजे...

"मराठा आरक्षणाच्या उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते त्या ठिकाणी गेले होते. त्यांची चर्चा झाली. वेगवेगळ्या समाजातील आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत असले पाहिजे. मागील सरकारनेदेखील मराठा आरक्षणाविषयी प्रयत्न केला. आघाडी सरकारने जो निर्णय घेतला तो हायकोर्टात टिकला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाविषयी प्रयत्न केला होता. पण ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे आता कायद्याच्या चौकटीत बसूनच आरक्षणाविषयी पुढील वाटचाल करणार आहोत," असे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar-Gopichand Padalkar
Rohit Pawar News : भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचे विरोधकांना खोचक उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांसोबत बैठक...

मुस्लिम आरक्षणावर अजितदादा म्हणाले...

मुस्लिम आरक्षणावर अजितदादा म्हणाले, "मुस्लिम समाजाचेदेखील काही प्रश्न आहेत. यासंबंधी हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार व संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतलेली होती. त्यांना न्याय दिला पाहिजे. याविषयी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे,"

Edited By : Mangesh Mahale

Ajit Pawar-Gopichand Padalkar
Kolhapur BJP News : भाजपमध्ये पदाधिकारी निवडीवरून वादाची ठिणगी; कोल्हापुरात बावनकुळे पॅचअपसाठी येणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com