Congress Politics : हरियाणा निवडणुकीत काँग्रेस 'विनेश'ला मैदानात उतरवणार, सहानुभुतीच्या आडून राजकीय डाव साधणार?

Congress And Vinesh Phogat : पॅरिस ऑल्मिपिक स्पर्धेत अपात्र ठरल्याने सुवर्ण पदकापासून दूर राहिलेली भारताची धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगटच्या आडून आता काँग्रेस आपला राजकीय डाव साधण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
Congress and Vinesh Phogat
Congress and Vinesh PhogatSarkarnama
Published on
Updated on

Congress News : पॅरिस ऑल्मिपिक स्पर्धेत अपात्र ठरल्याने सुवर्ण पदकापासून दूर राहिलेली भारताची धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगटच्या (Vinesh Phogat) आडून आता काँग्रेस आपला राजकीय डाव साधण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

विनेश ऑल्मिपिक स्पर्धेत अपात्र ठरताच विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली. ऐरवी जगभरात मोदींच्या शब्दाची दखल घेतली जाते त्यांच्यामुळे युक्रेन-रशिया युद्ध थांबल्याचं सांगितलं जातं, मग त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन विनेशला न्याय का मिळवून दिला नाही? असाही प्रश्न काँग्रेस नेते उपस्थित करत आहेत.

तर विनेशचा पराभव आणि तिच्याबद्दल देशवासियांना असणारी सहानुभूती हरियाणाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न काँग्रेस (Congress) नेत्यांनी सुरु केला आहे. ऑल्मिपिकमध्ये अपात्र घोषित करताच विनेश फोगाटने थेट कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

तर विनेशला आम्ही हरियाणातून (Haryana) राज्यसभेवर निवडून आणले असते. पण काँग्रेसकडे बहुमत नाही, असं म्हणत, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी विनेशबद्दलची सहानुभूती व्यक्त करत तिला राजकारणात आणण्याचे संकेत दिले. हुड्डा यांचे पुत्र दीपिंदरसिंह हुड्डा लोकसभेवर निवडून आल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पुढच्या महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे.

Congress and Vinesh Phogat
BJP Vs Shivsena UBT : अर्धवटराव, बालिश, विनोदबुद्धी अन् थेट ठाकरेंच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह; बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

मात्र या पोटनिवडणुकीत बहुमत असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता काँग्रेस विनेशला पुढे करत ही निवडणूक भावनिक करण्याच्या तयारीत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदके जिंकून देणारे हरियाणाचे खेळाडू असतात. पण मोदी सरकार त्यांच्यावर अन्याय करुन खेळांसाठीची आर्थिक तरतूद करताना गुजरातला झुकते माप देत हरियाणाशी भेदभाव करते, असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे.

केंद्र सरकारच्या तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या सत्ता तंत्राच्या विरोधावर मात करुन ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशविरूद्ध कट कारस्थान रचण्यात आले आणि तिला पदकापासून वंचित ठेवण्यात आले. मात्र या रचलेल्या कारस्थानाचे उत्तर जनता देईलच, असं वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केलं आहे.

Congress and Vinesh Phogat
Bacchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शरद पवारसाहेबांच्या भेटीला, महाविकास आघाडीसोबत जाणार?

तसंच सुरजेवाला यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांच्या शारीरिक व मानसिक जुलूमांविरूद्ध दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या आणि नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी दिल्ली पोलिसांनी फरफटत नेलेल्या विनेश फोगाटविरुद्ध मोदी सरकारने गुन्हा दाखल करुन खटला भरला. अन्यायाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विनेश आणि अन्य कुस्तीपटूंचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व काँग्रेसनेत्यांनी समर्थन केल्याची जाणीव देखील करुन दिली.

तर युक्रेन-रशिया युद्ध थांबविणाऱ्या पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करुन विनेशला न्याय का मिळवून दिला नाही? विनेश अंतिम फेरीत दाखल होत असताना पंतप्रधान मोदी तिचे अभिनंदन करण्यास का धजावत नव्हते? असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसने विनेश फोगटवरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगटच्या भावनिक मुद्याचे भांडवल करत काँग्रेसकडून तिला निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com