Bacchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शरद पवारसाहेबांच्या भेटीला, महाविकास आघाडीसोबत जाणार?

Bacchu Kadu Meet Sharad Pawar : बच्चू कडू यांनी शुक्रवारी महायुती सरकारला थेट 'अल्टिमेटम' दिला आहे. यातच कडू पवारसाहेबांची भेट घेण्यास आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
bacchu kadu sharad pawar
bacchu kadu sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

महायुतीत नाराज असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या भेटीसाठी पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी आले आहेत. बच्चू कडू यांनी महायुती सरकारला 'अल्टिमेटम' दिला आहे. यातच शरद पवारसाहेबांची ( Sharad Pawar ) भेट घेण्यासाठी आल्यानं आमदार कडू महायुतीतून बाहेर पडणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, "ही भेट अगोदरच ठरली होती. आम्ही सरकारला काही मुद्द्यांबाबत निवेदन दिलं आहे. त्याच मुद्द्यांवर पवारसाहेबांशी चर्चा करणार आहे. जसे जाती-धर्मावर राजकारण होते. तसे, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग अशा मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे."

bacchu kadu sharad pawar
Video Bachchu Kadu : बच्चू कडूंची सटकली! अधिकाऱ्याच्या कानाखालीच लगावली; नेमकं काय घडलं?

विधानसभेला 'मविआ'सोबत जाणार का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी म्हटलं, "अजून तसे काही ठरलं नाही. 1 सप्टेंबरपर्यंत महायुती सरकारला 'अल्टिमेटम' दिला आहे. महायुतीत मी खूश असो किंवा नसो. शेतकरी, मजूरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्या नाराजीचा सूर नेहमी आम्ही सरकारसमोर ठेवत असतो."

"शेतकरी आणि मजुरांचे प्रश्न, कर्जमाफी, दिव्यांगाच्या घरकुलाच्या प्रश्नाबाबत शरद पवारसाहेबांशी चर्चा करणार आहे," असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

bacchu kadu sharad pawar
Maharashtra Politics : तिसरी आघाडी सुसाट! राजू शेट्टीनंतर बच्चू कडू अन् इम्तियाज जलील वाढवणार महायुती, आघाडीचं टेन्शन

राणा दाम्पत्याला कंटाळून महाविकास आघाडीत जाणार असल्याचं बोललं जात आहे. याप्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, "मला कुणी वैतागू शकत नाही. माझा वाद त्यांच्याबरोबर आहे. पण, विषय एवढा महत्त्वाचा नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com