BJP Vs Shivsena UBT : अर्धवटराव, बालिश, विनोदबुद्धी अन् थेट ठाकरेंच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह; बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : सत्तेसाठी लाचार होऊन ठाकरेंनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करीत आहेत. हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत.
Uddhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : सत्तेसाठी लाचार होऊन ठाकरेंनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करीत आहेत. हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत.

बांगलादेशमधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. पण अशा गंभीर परिस्थितीतही अर्धवटराव ठाकरे यांना विनोदबुद्धी सुचत आहे. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते.

त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच ठाकरे (Uddhav Thackeray) बांगलादेशातील पीडित हिंदूंची थट्टा करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरु राहणार? एकनाथ शिंदे म्हणाले...

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे.

केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत आहे. पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होतात."

बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह

तसंच बावनकुळे यांनी ठाकरेंच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, बांगलादेशातील भयंकर, भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करून ते आदरणीय मोदींजींची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू, बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत आहेत. ज्यांना याही परिस्थितीत राजकारण सुचते त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावे लागेल. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असावा, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

Uddhav Thackeray, Chandrashekhar Bawankule
Bacchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शरद पवारसाहेबांच्या भेटीला, महाविकास आघाडीसोबत जाणार?

बांगलादेशाचा दौरा करावा

सत्तेसाठी लाचार होऊन ठाकरेंनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करीत आहेत. हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशाचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावे. बांगलादेशात प्रबोधन करावे, असंही बावनकुळे म्हणाले.

तसेच, हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत. हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शेहजाद्याला दिल्लीत जरूर लोटांगण घालावे, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अघाध ज्ञान (?) पाजळू नये, असा जोरदार हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या या बोचऱ्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com