INDIA Alliance : 'इंडिया आघाडी' जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार ? शरद पवारांच्या घरी समन्वय समितीची बैठक !

INDIA Alliance On Seat Allocation : भाजपविरोधी मतांची विभागणी होऊ नये, यासाठी एनडीए विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकच उमेदवार...
INDIA
INDIASarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजप आणि मोदी सरकारविरोधात प्रमुख विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडी राजकीय रणनीती आखणीसाठी सज्ज झाली आहे. इंडिया आघाडीची बिहार आणि बंगळुरुतील बैठकीनंतर मुंबईतही तिसरी बैठक पार पडली होती. मुंबईतील बैठकीत आघाडीची महत्त्वपूर्ण अशी समन्वय समितीची घोषणा करण्यात आली होती. या समन्वय पहिली बैठक आज (दि.१३ सप्टेंबर) पार पडत आहे. (Latest Marathi News)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र आणि आघाडी म्हणून भाजपला पराभूत करण्यासाठीची रणनिती यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. या समन्वय समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतच प्रमुख विरोधी पक्षांचे, अशा एकूण १४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

INDIA
BJP State Teachers Alliance: भाजप प्रदेश शिक्षक आघाडीच्या संयोजकपदी प्रशम कोल्हे यांची नियुक्ती

'इंडिया' आघाडीची ही समन्वय समितीची बैठक आज सायंकाळी ४ वाजता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास्थानी बैठक होत आहे. भाजपविरोधी मतांची विभागणी होऊ नये, यासाठी एनडीए विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकच उमेदवार देऊन अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याची रणनितीने पुढे जावे, या निकषावर जागावाटपाचे सूत्र ठरवले जाऊ शकते.

बैठकीत कशावर होणार चर्चा ?

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपाचे सूत्र या सोबतच सरकारच्या वतीने बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनासाठी विरोधकांची सर्वसहमतीने योजना आखण्यावर चर्चा होणार आहे. तसेच, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने देशातील प्रमुख पाच शहरांमध्ये रॅली काढण्याविषयी विचार करण्यात येणार आहे.

INDIA
Parbhani NCP News: परभणीत राष्ट्रवादीची घडी विस्कटली; पुढे आणखी धक्के बसणार...

इंडिया आघाडी समन्वय समित सदस्य -

शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

संजय राऊत (शिवसेना)

केसी वेणू गोपाल (काँग्रेस)

टीआर बालू (डी एम के)

तेजस्वी यादव (आरजेडी)

अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)

राघव चढा (आम आदमी पक्ष)

जावेद अली खान (समाजवादी पार्टी)

लल्लनसिंह (जेडीयू)

हेमंत सोरेन (जे एम एम)

डी राजा (सीपीआय)

ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स)

मेहबूबा मुफ्ती (पीडीपी)

INDIA
INDIA LokSabha Seat: 'इंडिया'तील जागा वाटपाचा तिढा सुटणार; बुधवारी फॉर्म्युला ठरण्याची शक्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com