BJP State Teachers Alliance: भाजप प्रदेश शिक्षक आघाडीच्या संयोजकपदी प्रशम कोल्हे यांची नियुक्ती

Chandrashekhar Bawankule News : डॉ. प्रा. नारायण राजूरवार यांची पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी वर्णी
BJP State Teachers Alliance
BJP State Teachers AllianceSarkarnama
Published on
Updated on

Pune BJP News: आगा्मी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजपमध्ये सध्या संघटनात्मक पक्षबांधणी, बैठका, मेळावे, शिबिरं, भेटीगाठीसह पद नियुक्त्यांनी प्रचंड वेग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश शिक्षक आघाडी कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी पुण्यातील डॉ. प्रा. नारायण राजूरवार यांची पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. प्रशम कोल्हे यांची प्रदेश संयोजक म्हणून नेमणूक करण्यात आली असून, कार्यकारिणीमध्ये एक सहसंयोजक, सात विभाग संयोजक आणि १३ कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. राजूरवार गेल्या १६ वर्षांपासून प्राध्यापक कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

BJP State Teachers Alliance
Thackeray and Raut Meet Pawar: उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; 'सिल्व्हर ओक'वर दोन तास खलबतं

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी इंडिया आघाडी(India Alliance) च्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीनेही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या (BJP) नवीन प्रदेश कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली होती. या नियुक्त्यांमध्ये भाजपकडून अधिकाधिक नवीन चेहऱ्यांना संधी देतानाच जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. माधव भांडारी यांची पुन्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून पक्षातील जुने नेते आणि राज्याची निवडणूकविषयक जबाबदारी सांभाळणारे सुनील कर्जतकर यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता खासदार व आमदारांना आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याने त्यांच्यावर संघटनेतील जबाबदारी देण्यात येऊ नये, अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याने ६० टक्के नवीन चेहऱ्यांना यंदा संधी देण्यात आली आहे. यापैकी बहुतांश पदाधिकारी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता कमी आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

BJP State Teachers Alliance
Jayant Patil News : '' फडणवीसांच्या सांगण्यावरून भिडे जरांगेंना भेटायला गेले असतील तर...''; जयंत पाटलांचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com