Winning Strategy of DK Shivkumar: काँग्रेसच्या विजयासाठी अशी होती डी.के. शिवकुमार यांची रणनीती?

Karnataka Elelction Result 2023 सिद्धरामय्या हे चांगले राजकारणी आहेत पण रणनीती आणि पक्ष व्यवस्थापनात डीके शिवकुमार त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत.
Winning Strategy of DK Shivkumar:
Winning Strategy of DK Shivkumar:Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Elelction Result 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला विजयाचं गोड फळ चाखायला लावणारी एक व्यक्ती म्हणजे कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार. या निवडणुकीच्या विजयात डी.के. शिवकुमार यांचा मोठा वाटा समजला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसला विजयाकडे नेण्यासाठी डी.के. शिवकुमार यांनी खुप मोठी आणि अडथळ्यांची लढाई लढली. पण याचवेळी या निवडणुकीतील त्यांच्या रणनीतीचीही मोठी चर्चा होत आहे.

2020 मध्ये डी.के. शिवकुमार यांच्यावर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. पण तरीही शिवकुमार यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. डी.के. शिवकुमार सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण ही शर्यत त्यांच्यासाठी तितकी सोपी नाही. याचे कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे देखील आहे. राजकारण आणि प्रशासनाच्या बाबतीत चतुर राजकारणी सिद्धरामय्या यांचाही मुख्यमंत्रीपदाकडे लक्ष लागले आहे.

Winning Strategy of DK Shivkumar:
New CM of Karnataka: कोण होणार कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री? 'या' दोन नावांना आहे पक्षश्रेष्ठींची पसंती

पण कर्नाटक निवडणुकीच्या वेळी भाजपने काँग्रेस आणि सिद्धरामय्यांसारख्या नेत्यांना जातीय मुद्द्यांवर शब्द युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डी.के. शिवकुमार यांनी पक्षाच्या नेत्यांना जनतेच्या मुख्य समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. सिद्धरामय्या हे अत्यंत चांगले राजकारणी आहेत पण रणनीती आणि पक्ष व्यवस्थापनात डी.के शिवकुमार त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. (Karnatak elections)

शिवकुमार यांची काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बरेच बदल करण्यात आले, मग ती रणनीती असो किंवा राजकारण, डीके शिवकुमार यांनी राज्यात काँग्रेसची ताकद वाढण्यासाठी स्थानिक मुद्द्यांवर काम केलं. भाजप सरकारमधील कथित भ्रष्टाचार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात 'पेसीएम' मोहिमेवर डी.के शिवकुमार यांनी अवलंबलेली रणनीती यांचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला.

Winning Strategy of DK Shivkumar:
Karnataka Election Result : "राहुल गांधींच्या 'भारत जोडो' चा करिश्मा; ज्या ज्या ठिकाणी यात्रा, तिथे काँग्रेस..."

सिद्धरामय्या यांना दोन जागा लढवण्यापासून रोखणे आणि इतर नेत्यांच्या निवडीविरुद्ध काम करणाऱ्या उमेदवारांना उभे करणे, यासारख्या निर्णयांच्या केंद्रस्थानी शिवकुमार होते. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारच्या काळात काँग्रेसने काही लोकाभिमुख योजना राबवल्या होत्या. याचाही काही प्रमाणात काँग्रेसला फायदा झाला. पण नंतर भाजपने या योजना बंदही केल्या. (Karnataka elections 2023)

पण मुख्यमंत्री पदासाठी सध्या डी.के. शिवकुमार आणि सिद्धारामय्या यांच्या शर्यत लागली आहे. डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्री ठरवण्याचे आव्हान आता काँग्रेससमोरही असणार आहे. पण दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपाचा करार केंद्रीय नेतृत्वाने प्रस्तावित केल्याचे संकेत काही काँग्रेस नेत्यांनी दिले आहेत. सध्या दोन्ही नेत्यांनी आपापल्या वक्तव्यातून आनंद व्यक्त केला असून हा पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com