
Russia Drone Attack Viral Video : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकेतील सर्वात भीषण अशा वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील (World Trend Center Attack) 9/11 हल्ल्याची आठवण करुन देणारी घटना रशियातील कझान शहरात शनिवारी (ता.21) घडली आहे.
कझान शहरात (Kazan Attack) एकामागून एक ड्रोन हल्ले करत 3 उंच इमारतींना लक्ष्य केल्याचे व्हिडिओ (Video) समोर आले आहेत. या हल्ल्याची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं दिसत आहे. मात्र, या हल्ल्यात जीवितहानी झाली आहे का नाही? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
तर हा हल्ला युक्रेनने (Ukraine) केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नुकतंच काही दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसोबतचे युद्ध (Wars) थांबवण्यासाठी आपण ट्रम्प यांच्याशी बोलण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, आजच्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा या दोन देशात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
तर रशियातील (Russia) कझान शहरावर झालेल्या ड्रोनच्या भीषण हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ड्रोन इमारतींना धडकल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय या हल्ल्यांनंतर रशियाचे दोन विमानतळे बंद केल्याची घोषणा केली आहे.
तसंच खबरदारी म्हणून आजूबाजूच्या इतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन (UAV) उंच इमारतींवर आदळताना दिसत आहेत. या हल्ल्यामुळे सोवेत्स्की, किरोव्स्की आणि प्रिव्होल्स्की या तीन जिल्ह्यांतील घरांना आग लागल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.