Wrestler Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट नोकरीवर परतले; आंदोलनाचं काय होणार?

Sakshi Malik: कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी भेट घेतली होती.
Wrestler Protest
Wrestler ProtestSarkarnama
Published on
Updated on

Brijbhushan Singh : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटुंचे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. ब्रिजभूषण सिंह यांना जो पर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा या कुस्तीपटूंनी घेतला. मात्र, आता कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट हे नोकरीवर परतले असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटुंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या कुस्तीपटुंनी केली.

Wrestler Protest
Pimpri-Chinchwad : मंत्रिमंडळ विस्ताराचा आणखी एक मुहूर्त; पिंपरी-चिंचवडचे खाते उघडणार का?

या पार्श्वभूमीवर कुस्तीपटुंनी दिल्लीत रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली. मात्र, या भेटी दरम्यान नेमकं काय चर्चा झाली, याची माहिती समोर आलेली नाही. पण या भेटीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट हे आपल्या नोकरीवर परतले आहेत.

दरम्यान, कुस्तीपटू साक्षी मलिकने या आंदोलनातून माघार घेतल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त साक्षी मलिकने फेटाळून लावले आहे. दरम्यान, कुस्तीपटूंनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या आंदोलनाला कलाटणी मिळाल्याचं बोललं जात आहे.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com