Yogendra Yadav : योगेंद्र यादव की प्रशांत किशोर, कोणाचा दावा ठरला खरा

Lok Sabha Election Result Yogendra Yadav : प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागा घटणार नसल्याचे अंदाज व्यक्त केला होता.
prashant kishor yogendra yadav
prashant kishor yogendra yadavsarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला कसे रोखणार, याचे विश्लेषण राजकीय अभ्यासक करत होते. त्यातही उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा घटणार नाही तर त्या वाढतीलच, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी भाजपचा उत्तर प्रदेशमधील जागा घटत असल्याचा दावा खरा ठरला आहे.

प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशमध्ये जागा घटणार नसल्याचे सूत्र मांडत भाजप पु्न्हा कमीत कमी त्यांच्या मागील वेळीच्या 303 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर यांच्या दाव्यामध्ये कोणाचा दावा खरा ठरणार याची चर्चा होती.

एक्झिट पोलमध्ये प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरत असल्याचे दिसत होते. मात्र, योगेंद्र यादव Yogendra Yadavआपल्या दाव्यावर ठाम होते की उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. योगेंद्र यादव यांच्य दाव्या प्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागा 40 वर आल्या आहेत.

योगेंद्र यादव यांचा दावा काय?

योगेंद्र यादव यांनी दावा केला होता की भाजपच्या मतांमध्ये घट होत आहे. तर, बसपला मागील वेळी गेलेली मते यावेळी काँग्रेस आणि सपाला मिळत आहे. म्हणजे काँग्रेस आणि सपाची उमेवादवार वाढतील. कारण मागील वेळी त्यांना मत दिलेली नागरिक त्यांनाच परत मतं देणार असल्याचे सागंत आहेत. त्यामुळे भाजप 40 पेक्षा कमी जागांवर विजयी होईल.

भाजप 40 च्या खाली येणार

योगेंद्र यादव म्हणाले की भाजपचा मतदार भाजपला सोडून जात आहे. त्यामुळे भाजप 50 च्या खाली येईल. मात्र हाट ट्रेंड राहिला तर भाजपला 40 खाली येईल, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे 2019 च्या निवडणुकीत 66 जागा जिंकणार भाजप यावेळी 33 जागा जिंकले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com