Yogi Adityanath on Abu Azmi : "कम्बख्त को यूपी भेज दो, उपचार कर देगें"; योगी आदित्यनाथांचा अबू आझमींवर हल्लाबोल

Yogi Adityanath on Abu Azmi : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमी यांच्यासह समाजवादी पक्षावरही निशाणा साधला.
Abu Azmi, Yogi Adityanath
Abu Azmi, Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

Abu Amzi News : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या विधानाचे आता उत्तर प्रदेश विधानसभेतही पडसाद उमटले. समाजवादी पक्षाचा आदर्शच औरंगजेब आहे. समाजवादी पक्ष औरंगजेबला हिरो करायला निघाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमी यांच्यासह समाजवादी पक्षावरही निशाणा साधला. तसेच आझमी यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवून द्या, आम्ही त्यांच्यावर उपचार करू असाही टोला त्यांनी लगावला.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, समाजवादी पक्षाच आपल्या आमदारांवर नियंत्रण नाही. की समाजवादी पक्षाचा आदर्शच औरंगजेब आहे? समाजवादी पक्ष औरंगजेबला हिरो करायला निघाला आहे. अशा अबू आझमी यांची पक्ष हकालपट्टी का करत नाही? आझमी यांना औरंगजेब चांगला वाटतो, आदर्श वाटतो, त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवून द्या, आम्ही त्यांच्यावर उपचार करू, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

Abu Azmi, Yogi Adityanath
Abu Azmi : औरंगजेबाचं उदात्तीकरण भोवलं; अबू आझमींना दणका, विधानसभेतून निलंबित

आझमींचे महाराष्ट्र विधानसभेतून निलंबन :

औरंगजेबचं उदात्तीकरण करणार विधान केल्याप्रकरणी अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विधानसभेने बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला.

"आत्ता सगळा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात जी लढाई होती ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती.", असं वक्तव्य अबू आझमी यांनी नुकतचं केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं.

Abu Azmi, Yogi Adityanath
Navneet Rana On Abu Azmi: औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींना नवनीत राणांनी ठणकावलं; म्हणाल्या,' ज्यांना प्रेम आहे, त्यांनी...'

अबू आझमी (Abu Azmi) यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. यामुळे विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, औरंगजेबाच्या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत, त्यांना सभागृहात घ्यायला नाही पाहिजे, असं म्हणत भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आझमी यांच्यावर हल्लाबोल केला होता.

तर औरंगजेबाची बढाई मारणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. अबू आजमी वर कारवाई करायला हवी अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. विधानसभेतील सत्ताधारी आमदारांचा संताप पाहता अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागेही घेतले होते. त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपली बाजू मांडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com