Parvez Musharraf : परवेझ मुशर्रफ यांचे ‘यूपी’तील 'नामोनिशान' मिटणार; योगी सरकारचा काय आहे प्लॅन?

Yogi Adityanath Pakistan Ex President : फाळणीपूर्वी परवेझ यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये राहत होते. तिथून ते दिल्लीत स्थायिक झाले होते.
Parvez Musharraf
Parvez MusharrafSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या जमिनीचा लिलाव होणार आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमधील कोताना गावात त्यांची 13 बिघा म्हणजे जवळपास आठ एकर जमीन आहे. या जमिनीचा गुरूवारी ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.

जमिनीचा लिलाव झाल्यानंतर ही जमीन खरेदीदाराच्या नावावर होईल. त्यानंतर मुशर्ऱफ यांच्या कुटुंबाचे बागपतमध्ये नाव राहणार नाही. दरम्यान, ही जमीन पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. जमिनीच्या ठिकाणी माहितीसाठी फलकही लावण्यात आलेला आहे. (Yogi Adityanath Decision)

Parvez Musharraf
MCD Election : दिल्लीत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; निवडणुकीत ‘आप’ला मोठा धक्का

परवेझ मुशर्ऱफ यांचे वडील मुशर्ऱफुद्दीन आणि आई बेगम जरीन हे कोताना गावात राहत होते. 1943 मध्ये ते दिल्लीला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. दिल्लीतच परवेझ मुशर्रफ आणि त्यांचे बंधू डॉ. जावेद मुशर्रफ यांचा जन्म झाला. 1947 मध्ये फाळणीच्यावेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले.

दिल्लीव्यतिरिक्त मुशर्ऱफ यांच्या कुटुंबाची हवेली आणि शेतजमीन कोतानामध्येही आहे. परवेझ मुशर्ऱफ यांच्या जमिनीची यापूर्वीच विक्री झाली होती. मात्र, त्यांचे बंधू आणि कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावावर असलेली सुमारे आठ एकर जमीन अजूनही त्यांच्या नावावर आहे.

Parvez Musharraf
Supreme Court : मुख्यमंत्री आहात म्हणून काहीही कराल का? सुप्रीम कोर्टाने फटकारले

कोतानातील हवेली त्यांच्या चुलत बंधू हुमायूं यांच्या नावावर झाली आहे. तर शेतजमिनीची नोंद 15 वर्षांपूर्वी शत्रू संपत्ती म्हणून करण्यात आली आहे. याच जमिनीचा लिलाव होणार आहे. जवळपास अर्ध्या जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया गुरूवारी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांवर मुशर्ऱफ या नावाच्या जागी खरेदीदाराचे नाव लावले जाईल.

दरम्यान, परवेझ मुशर्ऱफ हे पाकिस्ताचे लष्करप्रमुख होते. त्यानंतर ते राष्ट्रपतीही बनले. 5 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांचे निधन झाले. ते लष्करप्रमुख असतानाच कारगिल युध्द झाले होते. यामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला पिटाळून लावले होते.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com