Cash Controversy : एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले पैशांचे घबाड, अनिल गोटेंकडून वस्त्रहरण!

Arjun Khotkar Anil Gote : आमदार गोटे यांनी धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 बाहेर ठिय्या मांडला. पाऊस पडत होता आणि अधिकारी त्यांना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांनी नकार दिला.
Cash discovered in the room of MLA Arjun Khotkar’s PA, revealed by ex-MLA Anil Gote – sparking political uproar.
Cash discovered in the room of MLA Arjun Khotkar’s PA, revealed by ex-MLA Anil Gote – sparking political uproar.sarkarnama
Published on
Updated on

Anil Gote News : धुळे येथे अंदाज समितीमधील आमदारांना वाटण्यासाठी कोट्यावधी रुपये आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावाने बुक असलेल्या खोलीत हे पैसे ठेवले होते, असा दावा करत गोटे यांनी खोलीला कुलूप ठोकून बाहेर ठिय्या केला. गोटे यांच्या या ठिय्यामुळे आमदार आणि प्रशासनाची अक्षरश: पळापळ झाली. खोलीत तब्बल पाच कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील अंदाज समिती धुळे दौऱ्यावर आहे. ही समिती जिल्ह्यातील विविध विकास कामांची पाहणी करून त्याचा दर्जा, गुणवत्ता तपासणार होती. याच समितीला वाटण्यासाठी पाच कोटी रुपये अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक राहत असलेल्या धुळे येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत ठेवण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला होता. यानंतर त्यांनी या खोलीबाहेर ठिय्या मांडला. त्यांचा एक सहकारी बुधवारी दिवसभर येथे पहारा देत होता.

माजी आमदार गोटे यांनी धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 बाहेर ठिय्या मांडला. पाऊस पडत होता आणि अधिकारी त्यांना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांनी नकार दिला. पोलिसांना कळविल्यानंतरही चार ते पाच तास तेथे कोणीही आले नाही. माजी आमदार गोटे विश्रामगृहावर ठिय्या मांडून आहेत हे कळताच समितीचे आमदार आणि अधिकारी यांची अक्षरशः पळापळ झाली.

Cash discovered in the room of MLA Arjun Khotkar’s PA, revealed by ex-MLA Anil Gote – sparking political uproar.
NCP Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'स्थानिक'साठी जोरदार हालचाली; स्वबळावर लढण्याच्या तयारीला सुरुवात?

रात्री उशिरा येथे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी दाखल झाले. त्यांच्या समक्ष खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा तेथे रोकड आढळली. पोलिसांनी रोकड मोजण्याचे काम सुरू केले. या प्रकाराने धुळे विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. हा प्रकार समजतात अंदाज समितीचे आमदार अक्षरशः घामाघुम झाले. एकही आमदार विश्रामगृहावर आला नाही.

अर्जून खोतकरांनी मांडली बाजू

अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी आम्ही जिल्ह्याचा दौरा करत होतो. विश्रामगृहावर गेलेलो नाही. त्यामुळे संबंधित खोली आणि त्यात सापडलेले पैसे याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका मांडली आहे.

मंत्रालयातून फोनफोनी?

हा प्रसंग धुळे शासकीय विश्रामगृहात घडला आहे. मात्र त्याची धग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयापासून तर मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालयातून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात सातत्याने फोनाफोनी सुरू होती. आता सापडलेली रक्कम, विश्रामगृहातील खोली खोतकर यांच्या पीएच्या नावाने 15 मे पासून बुक होता. ही सर्व परिस्थिती पाहता पुढे काय? अंदाज समितीच्या आमदारांचे म्हणणे काय? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

अंदाज समितीचे काम काय?

शासकीय कामांमधील भ्रष्टाचार आणि अनियमितता तपासण्यासाठी विधिमंडळाची अंदाज समिती असते. समिती राज्यभर दौरे करून विकास कामांची पाहणी करते. या प्रक्रियेत गेली अनेक वर्ष अशाच प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जाते.

Cash discovered in the room of MLA Arjun Khotkar’s PA, revealed by ex-MLA Anil Gote – sparking political uproar.
Almatti dam height : ‘आलमट्टी’वरून राजकीय वातावरण तापलं ; जलसंपदा मंत्री विखे पुन्हा घेणार सर्वपक्षीय बैठक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com