PM Modi and Sandeshkhali News : पंतप्रधान मोदी 'संदेशखाली'तील 'त्या' पीडित महिलांची भेट घेणार?

Sandeshkhali Controversy News : PM Modi 6 मार्च रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार असल्याने जोरदार चर्चा
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Modi Visit West Bengal News : पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील प्रकरावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपासह विरोधी पक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता सरकारवर यावरून जोरदार टीका सुरू केली आहे. शिवाय, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असून, याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींनाही सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशखालीमधील पीडित महिलांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) 6 मार्च रोजी पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार असून, ते संदेशखालीजवळ एक महिला संमेलनास संबोधित करणार आहेत. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्याातील संदेशखाली हे सध्या प्रचंड चर्चेत आहे. येथील महिलांकडून त्यांच्यावार लैंगिक अत्याचार आणि हिंसाचार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
President Rule News : ममतांचं सरकार जाणार? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची SC आयोगाची शिफारस

संदेशखालीतील प्रकरणावरून भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात(Mamata Banerjee) आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तर प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पश्चिम बंगालचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम बंगालमध्ये भाजपाला बळकटी देण्यासाठीही असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?

संदेशखालीमधील अनेक महिलांनी तृणमूलचे स्थानिक नेते शाहजहाँ शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपणे आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. रात्रीच्या वेळी ते घरी मुलींना घेऊन जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांकडून तृणमूलच्या नेत्यांविरोधात आंदोलन केले जात असून, त्याला भाजपाचीही(BJP) साथ मिळत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. मागील महिन्यात शेख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी स्थानिकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. तेव्हापासून शेख फरार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Narendra Modi
Madhya Pradesh Politics : कमलनाथांचे कट्टर समर्थक भाजपत डेरेदाखल; छिंदवाड्यात काँग्रेस रिकामी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com