

नवी दिल्ली : देशात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे कोरोना (Covid19) लसीकरण (Vaccination) सुरू असताना आता लहान मुलांनाचे लसीकरणही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. औषध महानियंत्रकांनी झायझस कॅडिलाच्या लशीच्या आपत्कालीन वापराला शुक्रवारी मान्यता दिली आहे. बारा वर्षांपुढील मुलांवर या लशीच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता ही लस प्रत्यक्ष वापरास परवानगी मिळाली आहे. लहान मुलांसाठीची ही भारतातील पहिलीच लस आहे. (Zydus Cadila receives approval for Emergency Use Authorization for Vaccine)
झायकोव्ह-डी (ZyCov-D) असं या लशीचं नाव हे. ही डीएनएवर आधारीत जगातील पहिली आणि भारतीय बनावटीची लस आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यापार्श्वभूमीवर या लशीला हिरवा कंदील मिळाल्याने 12 वर्षांपुढील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांनी मागील महिन्यातच लहान मुलांची लस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येण्याबाबत वक्तव्य केलं होतं. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग फारसा झाला नाही. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये सज्ज ठेवली जात आहे. काही देशांमध्ये यापूर्वीच लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता देण्यात आली आहे.
भारतात ऑगस्ट महिन्यात लहान मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते, असे मांडविया यांनी म्हटलं होतं. संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने लहान मुलांचे लसीकरण महत्वाचे ठरणार आहे. तसेच लवकरात लवकर शाळा सुरू होण्यासाठीही हे पाऊल आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सप्टेंबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
लहान मुलांमध्ये प्रामुख्याने 12 ते 18 वयोगटातील मुलांचा समावेश असेल. झायडस कंपनीच्या लशीने लसीकरणाला सुरूवात होईल, असेही अरोरा यांनी स्पष्ट केलं होतं. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लशीच्या मुलांवर चाचण्या सुरू होत्या. कोव्हॅक्सिनचे निष्कर्ष सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता असल्याचे एम्सचे प्रमुख डॉ. रणजीप गुलेरिया यांनी सांगितले होते. त्यांनीही सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त सांगितला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.