Harshvardhan Patil: नेत्यांचा फिटनेस : व्यायाम, संतुलित आहार हेच कार्यक्षमतेचे रहस्य

Harshvardhan Patil fitness Politician Fitness Secrets: आठवड्यातून तीन दिवस योगासने-प्राणायाम, सूर्यनमस्कार करतो. एका वेळी २५ सूर्यनमस्कार घालत असल्यामुळे शारीरिक व्याधी नाहीत.
Harshvardhan Patil fitness
Harshvardhan Patil fitnessSarkarnama
Published on
Updated on

नियमित व्यायाम, आहारावर नियंत्रण व सतत हसतमुख राहणे या त्रिसूत्रीमुळे कार्यक्षमता कायम आहे. त्यामुळे साठीनंतरही रोज न थकता १८ तासांपर्यंत काम करू शकतो, असे सांगत माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी यांनी निरोगी आणि फिट असण्याचे रहस्य स्पष्ट केले.

मला लहानपणापासून व्यायामाची व शरीर तंदुरुस्त ठेवण्याची आवड आहे. माझे शिक्षण शिवाजी सैनिक स्कूलमध्ये झाले आहे. त्यामुळे व्यायामाला शिस्तीचीही जोड मिळाली. मी रात्री कितीही उशिरा झोपलो, तरी सकाळी पहाटे साडेपाच वाजता उठतो. दररोज पाच किलोमीटर चालणे ही माझी आवड आहे.

बाहेरगावी असल्यानंतर अनेक वेळा चालणे शक्य होत नाही. त्यावेळी जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. आठवड्यातून तीन दिवस योगासने-प्राणायाम, सूर्यनमस्कार करतो. एका वेळी २५ सूर्यनमस्कार घालत असल्यामुळे शारीरिक व्याधी नाहीत. कपालभाती, भस्रिका व अनुलोम-विलोमही नियमित करतो. तसेच, शरीराला आवश्‍यक सर्व व्यायाम करण्यावर माझा भर असतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

सकाळी उठल्यानंतर एक ग्‍लास कोमट पाण्यामध्ये दालचिनी पावडर टाकून पितो. तसेच, ब्लॅक कॉफीमध्ये एक चमचा गाईचे तूप टाकून पिणे मला आवडते. दिवसातून तीन-चार वेळा कॉफी आस्वाद घेत असतो. कमीत कमी चहा पिण्याकडे माझा कल असतो. थालीपीठ, लसणाची चटणी व दही असा सकाळच्या नाष्टा असतो. थालीपीठ लोण्यासोबत खाणे मला आवडते.

आठवड्यातून दोन-तीन दिवस उकडलेली अंडी, अंड्यांच्या पोळ्याही ब्रेकफास्टमध्ये असतात. दुपारच्या जेवणामध्ये दोन भाज्या असतात. यामध्ये शेवग्याची शेंग, कांद्याची पात, गवार, कारले अशा भाज्या प्रामुख्याने असतात. दुपारी पाच वाजता एखादे फळ खातो. रात्रीचे जेवण कमीत कमी करण्यावर माझा भर असतो. तसेच, आठवड्यातून एकदा मटण व देशी कोंबडी खाण्याची आवड आहे.

Harshvardhan Patil fitness
KDMC Election 2025: भाजपशी वाढत्या मतभेदांमुळे शिवसेनेचा कस लागणार

कुटुंब महत्त्वाचे

कुटुंबामध्ये पत्नी भाग्यश्री, मुलगा राजवर्धन, मुलगी अंकिता पाटील-ठाकरे व जावई निहार ठाकरे यांची महत्त्वाची साथ असते. कुटुंबाशी नियमित चर्चा करीत असल्यामुळे कामे करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळत असते. कायम आनंदी राहणे, हसत राहणे, सहनशीलता, सकारात्मक विचार व सर्वसामान्यांची कामे करणे ही निरोगी आयुष्याची पंचसूत्री आहे. समाजातील सर्वसामान्य माणसांना मदत करून लोकांमध्ये मिसळणे ही माझी आवड आहे.

क्रिकेट खेळणे व पोहणे मला आवडते. त्याचबरोबर बॉस्केटबॉल, व्हॉलिबॉल हे खेळही आवडतात. तसेच, चित्रपट पाहण्याची आवड आहे. नवनवीन चित्रपट आवर्जून पाहण्याचा माझा प्रयत्न असतो. उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने गरजा मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. कायम आनंदी व हसत राहणे, सकारात्मक विचार करणे, चांगले मित्र असणे महत्त्वाचे आहे.

Harshvardhan Patil fitness
नेपाळचा कारभार माजी न्यायाधीशांच्या हाती सोपवा! ‘Gen Z’चे समर्थन; कोण आहेत सुशीला कार्की?

माणसाला एकदाच शरीर व आयुष्य मिळाले असून शरीर निरोगी ठेवण व आयुष्य चांगल्या पद्धतीने जगणे गरजेचे आहे. निरोगी शरीर राहण्यासाठी वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करून घेतो. व्यक्तिमत्त्व, भाषा, संस्कृतीबरोबर शरीर निरोगी राहणे महत्त्वाचे असते. शरीराचा ठेवा चांगले ठेवणे, सांभाळणे हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. सुंदर आयुष्य व आनंदी जीवन जगण्यासाठी कमीत कमी गरजांमध्ये जीवन जगणे महत्त्वाचे आहे.

(शब्दांकन : राजकुमार थोरात, वालचंदनगर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com