नगर : नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची जामखेड येथे `न भूतो न भविष्यती` विजयी मिरवणूक काढण्यात आली. जामखेड येथील कार्यकर्त्यांनी काढलेल्या मिरवणुकीत जेसीबीने गुलाल उधळण्यात आला.
या मिरवणुकीसाठी जामखेड शहरातील मिरवणूक मार्गावर तब्बल 30 जेसीबी आणि 10 पोकलेन आले होते. नगर रोड वरील विश्रामगृहापासून सुरू झालेली मिरवणूक तीन किलोमीटरवर असलेल्या बाजार समिती जवळ थांबली.
गेल्या 30 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. बऱ्याच वर्षांनी या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार झाल्याने मिरवणुकी मध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. जामखेड तालुक्यातील साकत या गावी अतिवृष्टी झाल्याने आपण जामखेड मध्ये आलो होतो, मात्र निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकल्याने त्यांना नाकारता न आल्याने ही मिरवणूक काढली असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.
आपण मतदारसंघांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. आपण निवडणुकीत दारूचा एक थेंबही वाटला नाही. पैसेही वाटले नाहीत. भाजपने मात्र दारू आणि पैसा वाटला, असा आरोप करून मतदारसंघात अवैधरित्या विकली जाणारी सर्व दारू आपण बंद करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.
भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेच्या घडामोडींवरून भाजपवर त्यांनी टीका केली. भाजपला या निवडणुकीत शिवसेना नसली तरी आपण सत्तेत येऊ भाजपला वाटत होते, मात्र आता शिवसेनेकडे आकडेवारी असूनही भाजप सेनेवर अन्याय करत असल्याचे बोलले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिरवणूक झाल्यानंतर पवार यांनी जामखेड तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली. परतीच्या पावसामुळे या भागातील कांदा, सोयाबीन या पिकांची मोठी हानी झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांना आधीचाच पीक विमा मिळालेला नाही. त्यात हे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आधीचा विमा आणि आता झालेलं नुकसानीची मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.