उदगीर (जि. लातूर) : युती सरकारने केलेली विकास कामे जनतेपर्यत पोहचवण्यासाठी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली आहे.मात्र, या यात्रेनिमित्त शनिवारी (ता. 31) येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मोठे होर्डिंग व बॅनर लावण्यात येत असल्याने जनादेश यात्रेत बॅनर व होर्डिंग ची जत्रा दिसून येत आहे.
मराठवाड्यात दुसर्या टप्यातील जनादेश याञा अहमदपूर ते उदगीरात येत असुन मुख्यमंञ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे . जनादेश याञेनिमीत्त मोठ मोठी होर्डिंग लावण्यात आली आहेत. लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे . त्यामुळे उदगीर शहरात पाहावे तिकडे होर्डिंगच दिसत आहेत . येरव्ही कधी न दिसणारे डझनभर नेते होर्डिंगवर झळकताना दिसत आहेत .
ईच्छुक उमेदवारांची बॅनरबाजीत स्पर्धा लागली आहे. भाजपाची गल्ली ते दिल्लीत सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत काही इच्छुक उमेदवारांच्या बॅनर्सवर मुख्यमंञ्यानी केलेली कामे सरकारने घेतलेला निर्णय झळकताना दिसत आहे . मुख्यमंञी जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी राज्यभर फिरत असताना इच्छुक यात्रेचे निमित्त करून स्वतःचे मार्केटिंग करून घेताना दिसून येत आहे .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.