नागपूर : जिल्हा परीषदेत मागील वेळी आम्ही विरोधात असतानाही प्रश्न मांडण्याची संधी मिळत होती. आता सत्तेत असून विषय मार्गी लागत नसेल तर फायदा काय, यापेक्षा राजीनामा दिलेला बरा, असे शिक्षण समिती सदस्य शांता कुमरे संतापून म्हणाल्या. शांता कुमरे सभापती पाटील यांच्यावर चांगल्याच संतापल्या. बाहेर येताच त्यांनी एका कर्मचाऱ्याला फोन करुन बैठक संपली का, अशी विचारणा करीत पुढच्या बैठकीकरता फोन करू नका, अशा सूचनाही दिल्या. शिक्षण समितीची पहिलीच बैठक वादळी ठरली. सभापती पाटील यांना संपूर्ण समितीवर वर्चस्व हवे असल्याची चर्चा रंगली आहे.
सभापती भारती पाटील आणि सदस्या शांता कुमरे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर शांता कुमरे यांनी बैठकीतून बाहेर निघून गेल्या. बैठकीत बोलू प्रश्न मांडू दिला नसल्याचा आरोप करीत राजीनामा देण्याचा इशारा दिला. शिक्षण समितीची आज पहिली बैठक आज झाली. शिक्षण विभागाच्या निधीवर चर्चा झाल्यानंतर कुमरे यांनी रामटेक तालुक्यातील अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 'दबंग' पणे शिक्षकांकडून काम काढून न घेता प्रेमानेही काम काढून घेता येते, असे त्या म्हणाल्या. त्यावर समितीतील सदस्य दुधाराम सव्वालाखे व सभापती पाटील यांनी कुमरे यांना चुप राहण्याचे सांगितले. यावर त्या संतापल्या. त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली व त्यांनी सभात्याग केला.
जिल्हा परिषदेच्या शाळांची दुर्दशा झाल्यामुळे पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे पालकांचा ओढा खासगी कॉन्व्हेंट शाळांकडे वाढला आहे. याला टक्कर देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यांमध्ये एक इंग्रजी प्राथमिक शाळा उभारण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेतला. एस.सी., एस.टी., बीपीएल संवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी व खुल्या गटातील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गणवेश देण्याच्या सूचना करण्यात आली. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी 100 वॉटर फिल्टर लावले जात आहे. तर उर्वरित शाळांमध्ये वॉटर फिल्टर लावण्याची जबाबदारी ग्राम पंचायतींना देण्यात येतील. शिक्षण विभागाला सेस फंडातून मिळालेल्या निधीचा आढावा घेतला. त्याच प्रमाणे डिजिटल बोर्डचीही माहिती घेतली.
महिला व बालकल्याण, समाजकल्याण व कृषी समितीपाठोपाठ शिक्षण समितीच्या बैठकीत डीबीटी रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. डीबीटीमुळे सायकल वाटप रखडल्याची बाब बैठकीत समोर आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.