जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यावर टीका करत सुरेश धस म्हणाले,``मी तुरुंगात जाण्यास तयार``

ऊसतोड कामगारांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरवीण्याची मागणी करुन अटक करा जामीन सुद्धा करणार नाही,चुप बैठो नही तो कान काटूंगा, या सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार असेही सुरेश धस म्हणाले.
suresh dhas
suresh dhas
Published on
Updated on

आष्टी : ऊसतोड मजूरांवर पोलीसांनी अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांच्या मदतीला मी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. असे एक काय, हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी झेलायला तयार आहे. मला अटक झाली तरी मी यावर जामीन करणार नाही, ‘चुप बैठो नही तो कान काटूंगा’ या सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा विमा उतरविला जातो मग ऊसतोड कामगारांचा देखील 50 लक्ष रुपयांचा विमा कारखारदारांनी उतरविला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी राज्य सरकारवर टिकास्ञ सोडले.
 

जिल्ह्यात येत असलेल्या ऊसतोड कामगारांना पोलिसांनी मारहाण केल्याचे समजल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्याची हद्द पार केल्याच्या कारणावरुन श्री. धस यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यावर श्री. धस यांनी भूमिका मांडली.
ऊसतोड मजूरांच्या बाबतीत अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार साखर कारखाने सुरु ठेवत आहेत.माञ सद्यस्थितीत कोरोनामुळे संपूर्ण देशात लाॅकडाऊन आहे. अशा स्थितीत जर हे मजूर काम करीत आहेत तर त्यांच्या जिविताशीच खेळण्याचा हा प्रकार आहे. शेवटी ते देखील माणसच आहेत. आजच्या दिवशी देखील अनेक कारखाने सुरु आहेत,मग त्या मजूरांमध्ये सोशल डिस्टन्स आहे का? एकाएका कारखान्यावर आज हजारो कामगार आहेत ही गोष्ट कोणी लक्षात घेत नाही.केवळ 50 रुपये वाढवून देऊ आणि किराणा देऊन मजूरांची बोळवण करु, हा कोणता नियम आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादामध्ये ऊसतोड मजूरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी ही कारखान्यांची होती.अशावेळी हा नियम लागू होत नाही का? तीन तीन जिल्हे ओलांडून हे कामगार परतले मग तिथले प्रशासन काय करत होते,त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असेही सुरेश धस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com