वर्धा : वर्धा मतदारसंघातील भाजपचे आमदार डाॅ. पंकज भोयर यांचा कोराना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःच माध्यमांना ही माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन डाॅ. भोयर यांनी केले आहे.
कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात विविध भागांतील लोकप्रतिनिधींनी लोकांना मदत केली. जेवण वाटप, आरोग्य तपासणी, फवारणी सारखे उपक्रम राबवले. त्यामुळे त्यापैकी अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडले. भोयर यांच्या कुटुंबियांचीही तपासणी करण्यात आली आहे. अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. गेल्या ६ आॅगस्टपासून ते नागपूरमध्ये क्वारंटाईन होते. ताप आल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर असलेले कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाची लागण झाली. पाटील यांनी स्वतः याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून ते कॉंग्रेसच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले. कोरोना विरोधातील या लढाईत चुलते सतेज पाटील यांच्यासह प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ऋतुराज काम करत होते. केवळ कोल्हापूर दक्षिण मतदार संघावरच लक्ष केंद्रीत न करता शहरातील कसबा बावडा परिसरातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक उपयायोजना करण्यात ते आघाडीवर होते.
Edited By - Amit Golwalkar
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.